Bird Flying | (Photo Credits: Screengrab from Video tweeted by @trackingsharks)

समुद्रात असलेला शार्क मासा चोचीत आणि पायात पकडून एका पक्षाने आकाशात भरारी घेतली. या घटनेचा एक व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या भलताच चर्चेत आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की एका पक्षाने शार्क मासा (Bird Flying with a Large Fish) पकडला आहे आणि त्याने आकाशात भरारी घेतली आहे. हा व्हिडिओ यूएसए (USA)च्या मायर्टल बीच (Myrtle Beach) येथील आहे. या पक्षाचे नाव समजू शकले नाही मात्र त्याने शार्क मासा पकडून हवेत घेतलेली झेप पाहून किनाऱ्यावरचे लोक पाहातच राहिले. कनाऱ्यावरचे लोक हे दृश्य पाहून थक्क झाले.

अत्यंत विस्मयकारी आणि टीपायला तितकेच कठीण असलेले हे दृश्य फेसबुक युजर केली बर्बेज याने टीपले आहे. बर्बेज याने व्हिडिओ से्र करत म्हटले आहे की, गरुड? की कोंडोर ? (Condor दक्षिण अमेरिकेत आढळणारे एक गिधाड) मार्यटल बीच येथे एक शार्क पकडला. बर्बेज याने हा व्हिडिओ ट्विटरवरही शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 15 मीलियन व्ह्यूज मिळाले आहेत. (हेही वाचा, ऐकावं ते नवलंच! चीन मधील व्यक्तीच्या Bum मधून आत शिरला मासा, बाहेर काढण्यासाठी करावी लागली सर्जरी (Watch Video))

ट्विटर युजर्स 'ट्रॅकिंग शार्क्स'ने हा व्हिडिओ री-पोस्ट करत या पक्षासोबतच त्याने पकडलेला मासाही कोणत्या प्रजातीचा आहे हे सांगावे असे म्हटले आहे. ट्रॅकिंग शार्क्स या यूजरने आपल्या पोस्टमध्ये म्हले आहे की, हा पक्षी नेमका कोणता आहे कुणाला माहिती आहे का? नेमका त्याने शार्क मासाच पकडला आहे काय?

ट्विट

ट्विट

ट्विट

दरम्यान, हा व्हिडिओ 30 जूनला शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आता पर्यंत 21 हजार पेक्षाही अधिक लाईक्स आणि 7 हजारांहून अधिक रिट्विट्स झाले आहेत. हजारो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.