Sex on Plane: EasyJet flight मध्ये जोडपं टॉयलेट मध्ये सेक्स करताना आढळलं; प्रवाशांनी शेअर केला व्हिडिओ (Watch Video)
EasyJet-couple-Sex ।screengrab of the video. (Photo credits; Twitter/@VideosIrish)

EasyJet flight मध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. टॉयलेट मध्ये एक जोडपं सेक्स करताना कॅमेर्‍यामध्ये आढळलं आहे. जोडप्याचा हा व्हिडिओ सोशल मीडीयातही वायरल झाला आहे. Luton ते Ibiza हे विमान उडत असताना हा प्रकार घडला आहे. वायरल व्हिडिओ मध्ये या जोडप्याला पकडल्यानंतर सहप्रवासी देखील चिअर्स करताना दिसले. 37 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये EasyJet च्या विमानातील प्रकार कैद झाला आहे. ही घटना 8 सप्टेंबरची आहे. प्रवाशांनी दरवाजा उघडावा या प्रतिक्षेमध्ये केबिन क्रु देखील नर्व्हस होऊन उभे राहिलेले दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा या जोडप्याच्या दोघांच्याही ट्राऊझर्स या गुडघ्यापर्यंत खाली गेलेल्या दिसत आहेत. दरवाजा उघडताच लोकांनी एकच आवाज केला आणि तेव्हा आतील पुरूषाने देखील दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. Woman Harassed In INDIGO Flight: इंडीगो फ्लाईटमध्ये महिलेचा लैंगिक छळ, मुंबई-गुवाहाटी विमान प्रवासादरम्यान विनयभंगाच्या घटनेची पुनरावृत्ती .

"Oh my f***ing god," असं महिला बोलताना दिसत आहे. तिचा मित्र त्यांचा हा व्हिडिओ शूट करत होता. सोशल मीडीयातही वायरल झालेल्या या व्हिडिओला 3.6 मिलियन व्ह्यूज आहेत. या प्रकारामुळे नंतर या जोडप्याला पोलिसांकडे देण्यात आल्याची माहिती विमानकंपनीच्या अधिकार्‍यांनी म्हटलं आहे.