Sakshi Shivdasani On Vada Pav: तुम्ही मुंबईचे रहिवासी असाल किंवा राज्यात इतर ठिकाणी राहात असाल. तुम्हाला तुमच्या शहरातील प्रसिद्ध वडापाव (Vada Pav) नक्कीच माहित असेल. वडापावचं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. हा असा नाश्ता आहे, ज्याचा तुम्ही नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणात कधीही आनंद घेऊ शकता. मात्र, अलीकडेच मुंबईत राहणाऱ्या एका कंटेंट क्रिएटरने वडा पावाबद्दल अशी टिप्पणी केली की, ज्यामुळे नेटीझन्सचा संताप अनावर झाला आहे.
कंटेंट क्रिएटर साक्षी शिवदासानी (Sakshi Shivdasani) ने 'हॅव्हिंग सेड दॅट' या टॉक शोमध्ये मुंबईच्या प्रसिद्ध 'वडा पाव'बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तिच्या या वक्तव्याने शोचे होस्टही हैराण झाले. शोमध्ये साक्षीला विचारण्यात आलं की, तुला वडापाव आवडतो का? यावर साक्षी म्हणाली, 'वडा पाव हा कचरा आहे. मी त्याचा मनापासून तिरस्कार करते.' उकडलेले बटाटे आणि ब्रेड यात सुसंगतता नाही.' (हेही वाचा -Mumbai's Street Food Vada Pav: मुंबईचे स्ट्रीट फूड वडापाव जगातील 13 व्या क्रमांकाचे सर्वोच्च सँडविच)
साक्षीचे हे बोलणे ऐकून शोमध्ये उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. यानंतर तिला शोमधील होस्टने सांगितले की, 'सर्व प्रथम, वडापावमध्ये बटाटे उकडलेले नसून तळलेले आहेत. दुसरे म्हणजे, ब्रेड नाही तर पाव आणि स्वादिष्ट चटणी दिली जाते.' पण साक्षी तिच्या म्हणण्यावर ठाम राहिली आणि वडा पावला बकवास म्हणू लागली. यानंतर होस्ट स्नॅकच्या किंमती आणि वायब्सवर चर्चा करतो. शेवटी साक्षी सांगते, मी वडा पावापेक्षा समोसा पाव चांगला मानते, असं म्हणते. (World Vada Pav Day: मुंबई मधील या '7' वडापावची चव नक्की चाखाच!)
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर thehavingsaidthatshow वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ आतापर्यंत 20 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 47 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. त्याचबरोबर कमेंट सेक्शनमध्ये लोक साक्षीवर जोरदार टीका करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, वडापावमधील चटणी तुमच्या उच्चारापेक्षा 10000000000000 पट चांगली आहे. त्याचवेळी आणखी एका युजरने कमेंट केली की, 'टिपिकल साउथ बॉम्बे भैया गर्ल.' दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, तुम्ही वडा पावाबद्दल जसे विचार करता, आमचेही तुमच्याबद्दल असेच मत आहे.