कोब्रा (Cobra) आणि मुगूंस (Mongoose) हे एकमेकांचे जानी दुश्मन. यांचे वैर वर्षानुवर्षांचे आहे. यांच्या या झटापटीत साप रक्तबंबाळ होतो. पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात कोब्राचे नशीब बल्लवत्तर म्हणून तो चक्क मुगुंसाच्या हल्ल्यापासून वाचत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुगूंस आणि कोब्रा यांची झटापट चालू असताना अचानक तेथे डुक्करांचा कळप येतो आणि मुगुंसाला पळता भुई थोडी होते. डुक्कर झुंडीने येत असल्याचे पाहून मुगुंस चक्क तेथून पळ काढतो.
हा व्हिडिओ आयएफएस सुशांत नंदा (IFS Susanta Nanda) यांनी शेअर केला आहे. 'जो गरजेला कामी येतो तोच खरा मित्र' हे तुम्ही लहानपणी ऐकले असेल. पण या व्हिडिओतून ते प्रत्यक्षात दिसून येते. या व्हिडिओ एक मुंगूस आणि साप यांची झुंज पाहायला मिळत आहे. भारतीय ग्रे मुंगूस हा क्रोबा सारख्या विषारी सापांना मारण्यात पटाईत असतो. परंतु, या व्हिडिओतील मुंगुस सापाला मारण्यात अयशस्वी ठरतो. ते केवळ गरजेच्या वेळी सापाला मिळालेली मित्रांच्या साथीमुळे.
पहा व्हिडिओ:
Even Cobra has friends😊😊
Who was right & who was wrong in this nature’s play of things in denying the mongoose a good lunch?
Source: @vijaypTOI pic.twitter.com/Khn3a4wl0F
— Susanta Nanda IFS (@susantananda3) September 2, 2020
मुंगुसाने सापावर हल्ला करताच एक रानटी डुक्कर मुंगुसाच्या मदतीला धावून येतो आणि मुंगुस आणि सापाच्या मध्ये उभा राहतो. त्यानंतर काही कावळे सुद्धा सेव्ह द क्रोबा मिशनमध्ये सहभागी होतात. या सर्वांना बघितल्यानंतरही मुंगुस सापाला मारण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, रानटी डुक्करांची ताकद पाहता काही वेळाने मुंगुस हार मानून तेथून पळ काढतो, असे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. मुंगुस पळून गेल्यानंतर साप रानटी डुक्कर आणि कावळे यांना फणा काढून धन्यवाद देताना दिसत आहे.