बोईंग 737 (Boeing 737) विमान टेकऑफ करत असताना त्याचे आपत्कालीन लँडिंग (Boeing 737 Emergency Landing) करावे लागले. ज्यामुळे या विमानाची सुरक्षेच्या दृष्टीने पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. धक्कादायक म्हणजे उड्डाण करण्यासाठी हवेत झेपावत असताना या विमानाचे चाक अचानक निखळले. ज्यामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली. ही घटना दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) जोहान्सबर्गमधील (Johannesburg) ओआर टॅम्बो आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विमानातून अचानक धूर
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओसोबत शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये FlySafair ने म्हटले आहे की, ओआर टॅम्बो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण घेणाऱ्या बोईंग 737 विमानासोबत ही घटना घडली. विमानातून अचानक धूर निघू लागल्याचे लक्षात येताच त्याचे आपत्त्कालीन लँडींग करण्यात आले. Safair ही O.R वर आधारित एअरलाइन आहे. जी केम्प्टन पार्क, दक्षिण आफ्रिकेतील टॅम्बो आंतरराष्ट्रीय विमानतळ,सिव्हिल लॉकहीड L-100 हरक्यूलिस कार्गो चालवते. फ्लायसेफेअरने पुष्टी केली की फ्लाइट सुरक्षितपणे OR टॅम्बो येथे परत आले. या घटनेत कोणाला कोणतीही दुखापत झाली नाही. (हेही वाचा, Part Missing Of Plane In India: अलास्का एअरलाइन्स सारख्या घटनेची पुनरावृत्ती टळली, 737 MAX विमानाचा भाग गायब)
विमानासह जोहान्सबर्गला परतण्याचा निर्णय
एअरलाइनचे प्रवक्ते किर्बी गॉर्डन यांनी स्पष्ट केले की, विमानात काहीतरी तांत्रिक अडचण असल्याचे क्रू मेंबरला जाणवले. त्यामुळेत्याने विमानासह जोहान्सबर्गला परतण्याचा निर्णय घेतला. FA212 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लाइटने जोहान्सबर्गला परत जाण्याचा मार्ग बदलला आणि इंधन जाळण्यासाठी पॅरिसजवळ होल्डिंग पॅटर्नमध्ये प्रवेश केला आणि सुरक्षित लँडिंग करत धोका टाळला. विमानाचे लँडींग केल्यानंतर विमानातील प्रवाशांना नंतर केपटाऊनला जाणाऱ्या बॅकअप विमानात बसवण्यात आले. (हेही वाचा, लॅंडिंग करताना बोइंग 737 विमान नदीत कोसळले; सर्व 136 प्रवासी सुरक्षित)
बोईंगच्या सुरक्षीततेबद्दल चिंता
विमानाच्या आपत्कालीन लँडींगमुळे बोईंगच्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, 737 MAX ने आपत्तीजनक घटना अनुभवली. अलिकडेच एका बोईंग अभियंत्याने 787 ड्रीमलाइनरबद्दल आवाज उठवला होता. त्याने असे सुचवले की, संभाव्य संरचनात्मक समस्यांमुळे ते त्वरित नवनिर्मीत केले जावे. अभियंत्याने आरोप केला की विमानातील भागांमधील अंतर स्वीकारार्ह मानकांपेक्षा जास्त आहे. ज्यामुळे इशारा देण्यापूर्वीच विमान अपघातग्रस्त होण्याचा धोका अधिक आहे.
व्हिडिओ
🇿🇦🇺🇸 A Boeing 737-800 lost a wheel while taking off from Johannesburg Airport (South Africa), Aviation24 reports.
Ground personnel identified the damage and informed the pilots. The plane returned and landed safely.
No one was injured during the emergency, but there were flight… pic.twitter.com/5JNIyE6zGA
— Lord Bebo (@MyLordBebo) April 23, 2024
दरम्यान, अभियंत्याच्या दाव्यांचे बोईंगने खंडन केले आहे. बोईंगने म्हटले आहे की, 787 वरील गंभीर संरचनात्मक समस्यांबद्दलचे आरोप चुकीचे आहेत. कंपनीने त्याच्या विमानाची गुणवत्ता आणि दीर्घकालीन सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी लागू केलेल्या सर्वसमावेशक सुरक्षा उपायांचे पालन करतात.