स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंगचित्र काढून भाजपची शिवसेनेवर खोचक टीका
Swatantryaveer Savarkar and Balasaheb Thackeray cartoon Published by BJP

स्वातंत्र्यवीर सावरकर (watantryaveer Savarkar) गौरव प्रस्ताव मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या भाजपला शिवेसनेने जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही पक्षांती सामना सुरु असतानाच भाजपने आता शिवसेनेवर व्यंगचित्राचा आधार घेऊन टीका केली आहे. स्वातंत्र्यावीर सावरकर आणि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे व्यंगचित्र (Cartoon) काढून ही टीका करण्यात आली आहे. हे व्यंगचित्र महाराष्ट्र भाजप (BJP) अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. या टीकेला शिवसेना (Shiv Sena) काय प्रत्युत्तर देते याबाबत उत्सुकता आहे. एकेकाळी मित्रपक्ष राहिलेल्या या दोन्ही पक्षांत येत्या काळात दोन्ही पक्षात 'सामना' रंगणार असे दिसते.

भाजपने पोस्ट केलेल्या व्यंगचित्रात बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे आकाशात एकमेकांना भेटले आहेत असे दाखवले आहे.. या भेटीचे चित्र दाखवताना बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडी एक संवाद लिहिण्यात आला आहे. "तात्याराव काय म्हणू आता मी! मला वाटलं होतं पोरगा नाव काढेल. पण ह्याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली" असा तो संवाद आहे. (हेही वाचा, 'राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या अमृता फडणवीस यांना आवरा' शिवसेना नेते किशोर तिवारी यांच्याकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांना पत्र)

भाजप ट्विट

विधमंडळात सर्वाधिक आमदार (105) निवडूण आल्याने सर्वात मोठा पक्ष ठरुनही विरोधी पक्षात बसावे लागल्याने भाजपमध्ये सध्या जोरदार अस्वस्थता आहे. त्यामुळे भाजपचा एकही नेता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकासआघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दरम्यान, सावरकर गौरव प्रस्तावावरुन भाजप विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना रंगला आहे. दरम्यना, सावरकर हा शिवसेनेचाही जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे याच मुद्द्यावरुन शिवसेनेची कोंडी करण्यावर भाजपचे सर्वाधिक लक्ष आहे. त्यामुळे हे व्यंगचित्र म्हणजे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.