'राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या अमृता फडणवीस यांना आवरा' शिवसेना नेते किशोर तिवारी यांच्याकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांना पत्र

भाजपचे विरोधीपक्षेनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एमआयमच्या वारिस पठाण यांच्या वादग्रस्त विधानवरून शिवसेना (Shiv Sena) पक्षावर शाब्दिक हल्ला चढवला होता. त्यानंतर शिवसेनेचे युवानेते आणि खासदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेला प्रत्यूत्तर दिले होते. दरम्यान, अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही या वादात उडी घेऊन अदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावरून शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या अमृता फडणवीस यांना आवरा, या आशयाचे पत्र शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांना लिहले आहे. याआधी शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनीही अमृता फडणवीस यांना खडेबोल सुनावले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेबाबत केलेले विधान सध्या बरेच चर्चेत आहे. MIM नेते वारिस पठाण यांच्या वादग्रस्त विधानावर टिका करत शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील पण आम्ही बांगड्या घातल्या या विधानाचा निषेध करत आदित्य ठाकरे यांनीही त्यांनी खडेबोल सुनावले होते. त्यावर बुधवारी (25 फेब्रुवारी) अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून 'ज्यांना सर्व आयतं मिळालं आहे त्यांना याची किंमत कळणार नाही' अशी बोचरी टिका केली होती. यावर किशोर तिवरी म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस या दोघांनाही राजकीय आगपाखड करण्यापासून आवर घाला. देवेंद्र आणि अमृता फडणवीस जी टीका करत आहेत. त्यामुळे हिंदू पक्ष दुरावत आहेत, ते जवळ येणे आणखी कठीण होत आहे. निवडणूक निकालानंतर जी युती होऊ शकली नाही आणि भाजपाला सरकार बाहेर जावे लागले. हे देवेंद्र फडणवीस यांच्या अरेरावीमुळे झाले. देवेंद्र फडणवीस यांचा अतिआत्मविश्वास त्यांना नडला आहे. तसेच अमृता फडणवीस यांनी केलेले ट्विट हे अशोभनीय आहे. भारतीय संस्कृतीतील पती आणि पत्नीच्या संस्कृतीला धक्का देणारे आहे. तसेच अमृता फडणवीस यांच्या वर्तनामुळे 2024 मध्ये भाजपाला नुकसान होऊ शकते. असे किशोर तिवारी यांनी पत्रात लिहले आहे. हे देखील वाचा- राज्य सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे

देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर टिका करत महिला या सर्वात शक्तिशाली असून त्या बांगड्या परिधान करतात. राजकारण हे चालतच राहते, पण मानसिकता बदलायला हवी, असे आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना खडे बोल सुनावले होते. तसेच या विधानाबाबत माफी मागण्याचे आवाहन ही केले होते. आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत "रेशमी किड्याला आयुष्यातील 'उपहास' कधीच समजणार नाही, पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन 'रेशमी' आयुष्याचा उपभोग ते घेतच त्यांची भरभराट होते," असे अमृता फडणवीस यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेना टोला लगावला होता.