सोशल मीडियाची ऐवढी ताकद आहे की भल्याभल्यांचे आयुष्य पालटले गेले आहे. तर नुकताच दिल्लीतील बाबा का ढाबाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर कोरोना व्हायरसच्या काळात फटका आणि गरीबी सहन करणाऱ्या वृद्ध दांपत्यांकडे खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसुन आले. तसेच त्यांच्या मदतीसाठी सुद्धा काहींचे हात पुढे सरसावण्यासह त्यांना पाठिंबा दिला गेला. याच पार्श्वभुमीवर आता अजून एका 90 वर्षीय वृद्धाचा व्हिडिओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. कांजी वडे स्टॉल चालवणाऱ्या या आजोबांचे कोरोना व्हायरसमुळे फार मोठे नुकसान झाले आहे. तसेच यामधून मिळणाऱ्या उत्त्पनाला ही त्याचा फटका बसला आहे.(Baba Ka Dhaba चा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वृद्ध दांपत्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले बॉलिवूड कलाकार, पहा ट्विट्स)
इंस्टाग्राम युजर धनिष्ठा ने नुकताच 90 वर्षीय वृद्धाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जे गेल्या 40 वर्षांपासून कांजी वड्याची विक्री करतात. पण कोरोना व्हायरसमुळे त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे दैनंदिन जीवन जगण्यासाठी त्यांना काही समस्या उद्भवत आहेत.(दिल्ली: बाबांच्या भावूक व्हिडिओनंतर 'Baba Ka Dhaba' ला नेटकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद; पहा फोटोज आणि व्हिडिओज)
धनिष्ठा हिने हा व्हिडिओ शेअर करत या वृद्धाची मदत करावी असे आवाहन केले आहे. या व्हिडिओला तिने कॅप्शन देत असे म्हटले आहे की, माझे कांजी वडे वाले काका, गेल्या 40 वर्षांपासून कांजी वड्यांची विक्री करत असून त्यांचे वय 90 वर्ष आहे. या कोरोना व्हायरसमुळे त्यांना फक्त 250-300 रुपयेच मिळतात. त्यांच्या स्टॉलच्या अचूक ठिकाणाबद्दल विचारले असता तो प्रोफेसर कॉलनी, कमला नगर, आगरा येथील इच्छा बेकरीजवळ आहे. मला आशा आहे की तुम्ही लोक येथे येऊन खाल आणि त्यांची मदत कराल. तुम्ही त्यांना येथे रोज पाहू शकता. ते आपला स्टॉल रोज संध्याकाळी 5.30 वाजता सुरु करतात.