Old Couple’s Baba Ka Dhaba (Photo Credits: Twitter)

Baba Ka Dhaba  Viral Video: सोशल मीडियात व्हायरल झालेल्या एका फोटो किंवा व्हिडिओ मुळे अनेकांचे आयुष्य पालटले गेले आहे. तर आता सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिल्लीतील मालवीय नगर येथे असणारा एक ढाबा 80 वर्षाच्या वृद्धाकडून चालवला जात असल्याचे दिसून आले आहे. त्यात पुढे असे ही दिसून आले आहे की, ढाब्यावरील खाण्याची विक्री न झाल्याने कांता प्रसाद यांना अश्रु अनावर होत आहेत. त्यांच्या ढाब्याचे नाव बाबा का ढाबा असे ठेवण्यात आलेले आहे. हा ढाबा कांता प्रसाद त्यांची पत्नी यांच्यासोबत चालवतात. सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता त्यांचे फार नुकसान झाले असून त्यांना आर्थिक चणचण फार जाणवत आहे.

बाबा का ढाबाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याकडे खवय्यांची फारच गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभुमीवर बॉलिवूड मधील कलाकारांनी कांता प्रसाद यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. यामध्ये रवीना टंडन, स्वरा भास्कर, रणदीप हुड्डा, निमरित कौर, सुनिल शेट्टी यांनी ट्विट करत या दांपत्यांच्या प्रती आपले प्रेम आणि पाठिंबा दर्शवला आहे.(दिल्ली: बाबांच्या भावूक व्हिडिओनंतर 'Baba Ka Dhaba' ला नेटकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद; पहा फोटोज आणि व्हिडिओज)

>>रवीना टंडन

>>स्वरा भास्कर

>>सुनील शेट्टी

>>निमरत कौर

>>रणदीप हुड्डा

दरम्यान, बहुतांश जणांचा बाबा का ढाबाला सपोर्ट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांचे काम सुरु झाले आहे. कांता प्रसाद यांनी असे म्हटले आहे की, त्यांचा ढाबा पूर्वीपेक्षा आता उत्तम सुरळीत सुरु झाला आहे. कांता प्रसाद लाल यांनी 1990 पासून त्यांचा हा ढाबा सुरु केला आहे. त्यांच्या ढाब्यावर चहा, भात, डाळ, भाजी, चपाती, पराठे विक्री करण्यात येतात. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सामान्य व्यक्तींचे आमदार सोमनाथ भारती यांनी या ढाब्याला भेट दिली.