Apple iPhone smartphone (PC - Twitter)

एखाद्याने ऑनलाइन स्मार्टफोन विकत घेतला आणि डिलिव्हरीच्या वेळी बॉक्समधून काहीतरी वेगळं आल्याच्या बर्‍याच घटना तुम्ही ऐकल्या असतील. परंतु, आपण आज या घटनेच्या अगदी उलट बातमीविषयी सांगणार आहेत. एका व्यक्तीने ऑनलाइन सफरचंद खरेदी केले. परंतु जेव्हा त्याने डिलिव्हरी बॉक्स उघडला तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. या डिलिव्हरी बॉक्समध्ये त्याला अॅपलचा iPhone SE स्मार्टफोन दिसला. ही घटना यूकेची आहे.

डेली मिरर मधील वृत्तानुसार, 50 वर्षीय निक जेम्सने ऑनलाइन ग्रॉसरी वेबसाइट Tesco वरून सफरचंद मागितले. त्यानंतर तो कंपनीच्या लोकल स्टोअरमध्ये आपले सामान घेण्यासाठी गेला. स्टोअरला सांगण्यात आले की, त्यांच्या सामानासोबत एक सरप्राइस बॉक्सही आहे. जेव्हा त्याने हा बॉक्स उघडला तेव्हा, जेम्स आश्चर्यचकित झाला. त्यात एक आयफोन एसई होता. (वाचा - NASA ने अंतराळातून शेअर केले पृथ्वीचे आश्चर्यचकित करणारे फोटोज; See Photos)

या घटनेनंतर जेम्सने ट्विटरवर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले, 'आम्ही सफरचंद ची ऑर्डर दिली होती आणि Apple आयफोन मिळाला! या घटनेमुळे माझ्या मुलाचा दिवस बनला. ' सर्वात चांगली गोष्ट म्हणजे फोनवर ऑर्डर केलेले सफरचंददेखील जेम्सला मिळाले. ट्वीटमध्ये कार्डसह फोनचे फोटो शेअर करताना जेम्सने नेमके प्रकरण काय आहे हे स्पष्ट केले आहे.

जेम्सने डेली मिररला सांगितले, 'मला वाटले होते की, हे सरप्राइज ईस्टर एग किंवा काहीतरी असू शकते. मी बॉक्स उघडला तेव्हा मला धक्का बसला. वास्तविक हे सरप्राईज एका प्रचार मोहिमेचा एक भाग आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या भेटवस्तू देत आहे. इतर बर्‍याच ग्राहकांनी ट्विटद्वारे त्यांच्या सरप्राईज गिफ्ट्सबद्दलही सांगितले आहे. काहींना फिटनेस बँड देण्यात आले आहेत, तर काहींना वायरलेस इअरबड्स देण्यात आले आहेत.