कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव आणि त्यामुळे गंभीर होत जाणारी परिस्थिती लक्षात घेत देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्य, भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक आणि हॉस्पिटल्स, मेडिकल स्टोर्स, बँका यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता सारे व्यवहार बंद आहेत. तसंच अनेकांना 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे या काळात अनेक महिला घरातून ऑफिसचे काम करत आहेत. त्याचबरोबर घरातील कामं, मुलं, संसार अशा दुहेरी बाजू सांभाळत आहेत. या महिलांच्या सन्मानार्थ अमूलने खास डूडल साकारले आहे. हे डूडल शेअर करत कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळात घरातून काम करणाऱ्या आणि घरासाठी काम करणाऱ्या महिलांप्रती आदर व्यक्त करण्यात आला आहे.
अमूलच्या या क्यूट डूडलमध्ये एक स्त्री लॅपटॉप समोर बसून कामानिमित्त फोनवर बोलताना दिसत आहे. तर बाजूला अमूल गर्ल ब्रेड बटर खात बसली आहे. दुसरीकडे तीच स्त्री स्वयंपाकघरात काम करताना मोबाईलवर कामाचे अपडेट्स पाहताना दिसत आहे. "Mom is where the heart is..." असा संदेश या डूडलवर पाहायला मिळत आहे. (अमूलने डूडल साकारत केले मोदींच्या दिवे लावण्याच्या संकल्पनेचे समर्थन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली अशी प्रतिक्रीया)
Amul Topical:
#Amul Topical: Tribute to women working from home and working for home during CoVid lockdown! pic.twitter.com/8IewWqUwQb
— Amul.coop (@Amul_Coop) April 10, 2020
यापूर्वी अनेकदा खास प्रसंग, क्षण, महत्त्वाचे दिवस अमूलने डूडलच्या माध्यमातून सजवले आहेत. कोरोनाचे संकट आल्यानंतरच अमूल अनेक डूडल साकारले. या गंभीर संकटात आपल्या जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेंस यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे डूडल अमूलने साकारले होते. तर नरेंद्र मोदी यांच्या दिवा लावण्याच्या संकल्पनेला डूडल साकारुन अमूलने साथ दिली होती.