Watch Video: रानू मंडल नंतर या महिलेच्या गाण्याचा व्हिडिओ होत आहे Viral
Viral Video (Photo Credits: Twitter)

सोशल मीडियावर वायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे रानू मंडल यांचा आयुष्य रातोरात बदललं. पश्चिम बंगालमधील एका रंगात नावाच्या रेल्वेस्टेशनवर भीक मागून स्वतःचं पोट भरणाऱ्या रानू यांच्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका वायरल झाला की बॉलीवूडमधील प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमिया यांनी रानू यांनीच त्यांच्या एका सिनेमात गाण्याची संधी दिली. अशा प्रकारे प्लॅटफॉर्मवर राहणाऱ्या रानू मंडल या बघता बघता स्टारही बनल्या. परनु आता मात्र एका नवीन महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर चर्चेचा विषय बनला आहे.

एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे, जिचा आवाज ऐकल्यावर तुम्हाला रानू मंडलची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. सुबोध घिलडीयाल नावाच्या एका ट्विटर युझरने हा व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ शेअर करताना त्याने प्रश्न विचारला की, "या सुरेल आवाजाच्या महिलेला कोणी शोधू शकेल का?" लगेचच अनेक नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त तर केल्या आहेतच पण त्याही सोबत या बाईच्या आवाजाचं कौतुकही झालं आहे.

पहा हा व्हिडिओ,

व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की एक महिला 'ताज महाल' या सिनेमातील ‘जो वादा किया वो…’ हे प्रसिद्ध गाणं गात आहे.

विशेष म्हणजे अनेक नेटकऱ्यांनी ही महिला रानू मंडलपेक्षाही उत्तम गाते असं मत व्यक्त केलं आहे. परंतु ही महिला कोण आहे? कुठे राहते आणि काय करते हे अद्यापही कळलेलं नाही.

Nude Photo Shoot: मराठी अभिनेत्री, मॉडेल निकिता गोखले न्यूड फोटोशूट सोशल मीडियात व्हायरल, पाहा फोटो

मात्र हे निश्चित आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकल टॅलेंट समोर येत आहे. आणि कलेचा वारसा असूनही कधीही प्रसिद्धी न मिळालेले लोक आता लोकांसमोर येत आहेत. दरम्यान रानू मंडल मात्र एका फॅनसोबत केलेल्या गैरवर्तवणुकीमुळे काहीच दिवसांपूर्वी ट्रोलचा विषय बनल्या होत्या.