Porn Industry करियर म्हणून निवडल्यावर Mia Khalifa हिस कुटुंबाकडून आला 'हा' अनुभव; केला धक्कादायक खुलासा
Mia Khalifa (Photo Credits: Video grab)

माजी अ‍डल्ट फिल्म (Adult Film) अभिनेत्री मिया खलिफाने (Mia Khalifa), जेव्हा अशा इंडस्ट्रीमध्ये ती काम करत आहे हे तिच्या कुटुंबियांना समजले तेव्हा कसा त्यांनी तिचा त्याग केला, तिच्याशी संबंध तोडले याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. बीबीसीच्या (BBC) हार्डाटक (HARDtalk) मध्ये बोलताना, खलिफाने अडल्ट चित्रपटात काम करण्याच्या तिच्या प्रवासाबद्दल सांगितले. ती म्हणते, 'बंडखोरीपासून ते स्वतःला काहीतरी वेगळे करून सिद्ध करण्याचा प्रवास पाहता मला स्वतःला धक्का बसतो.' यावेळी मियाला तिच्या कुटुंबाविषयही काही प्रश्न विचारण्यात आले.

‘सुरुवातीला तू जेव्हा अशा इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा तुझ्या कुटुंबाला याविषयी माहित होते?’ मुलाखतकार विचारतो. ज्याचे उत्तर ‘नाही’ असे येते. ती पुढे म्हणाली, ‘जेव्हा माझ्या कुटुंबाला याबाबत कळाले तेव्हा त्यांनी मला नाकारले. माझा स्वीकार करण्यास नकार दिला. मला फक्त आजूबाजूच्या जगापासूनच नाही तर, माझ्या कुटुंबापासूनही पूर्णपणे विरक्त असल्याचे जाणवले.’

‘मी ही इंडस्ट्री सोडल्यानंतरही मी एकटीच होते. त्यावेळी मला जाणवले की काही चुका या क्षमा करण्यायोग्य नसतात. परंतु वेळ सर्व जखमा बरे करतो माझ्याही बाबतीत असेच घडले. आता गोष्टी अधिक चांगल्या होत आहेत.’ (हेही वाचा: माजी XXX पॉर्न स्टार मिया खलीफा हिचा मादक अंदाज, इंटरनेटवर अनेकांचा कलेजा खलास)

लेबेनॉनहून तिच्या आई-वडिलांसोबत मिया अमेरिकेत आली. तिचे शालेय शिक्षण इथेच पूर्ण झाले. टेक्सास विद्यापीठात तिने इतिहासाचे शिक्षण घेतले आहे. ती केवळ 22 वर्षांची असताना ‘पॉर्नहब’वर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या व्यक्तीमध्ये तिचा समावेश होता. स्वतःला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी बंडखोरी करणे हा फक्त आग्रह नव्हता, मात्र ती इच्छा होती. हीच महत्वाकांक्षा तिला पॉर्न इंडस्ट्रीमध्ये घेऊन आली. एकीकडे प्रसिद्धी मिळत गेली मात्र दुसरीकडे आत्मविश्वासही होत गेला.