Miscreants Urinate On Student's Face: मेरठमध्ये विद्यार्थ्याचे अपहरण, मारहाण केल्यानंतर आरोपींनी मुलाच्या चेहऱ्यावर केली लघवी; Watch Video
Miscreants Urinate On Student's Face (PC - Twitter)

Miscreants Urinate On Student's Face: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठ (Meerut) मध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही तरुणांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत त्याच्या तोंडावर लघवी केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पीडित मुलाला काही तरुणांकडून मारहाण केली जात आहे. तसेच एक आरोपी पीडित मुलावर लघवी करताना दिसत आहे. ही घटना 13 नोव्हेंबरला घडली. वृत्तानुसार, पीडित विद्यार्थी हा 12वीच्या वर्गात शिकत आहे. तो दिवाळीची मिठाई देण्यासाठी आपल्या मामीच्या घरी जात होता. काही मुलांनी तरुणाचे अपहरण केले आणि त्याला जवळच्या जंगलात नेले. त्यांनी तरुणाला जंगलात बेदम मारहाण केली आणि त्यानंतर एका तरुणाने त्याच्यावर लघवी केली. त्यांनी या भीषण कृत्याचे चित्रीकरण करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणे, लघवी करणे आणि या कृत्याचे चित्रीकरण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींनी या कृत्याचे चित्रीकरण करून तरुणाला ब्लॅकमेल करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली. (हेही वाचा - Viral Video: कोचिंग क्लासमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये बसण्यावरून जोरदार भांडण, व्हिडिओ व्हायरल)

दरम्यान, पीडित विद्यार्थ्याचे वडील आपल्या मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी गुरुवारी (16 नोव्हेंबर) याप्रकरणी गुन्हा दाखल केला. हे हल्लेखोर पीडित मुलाला ब्लॅकमेल करत होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

तथापी, पीडित मुलाच्या वडिलांनी एफआयआर चुकीचा नोंदवला गेला असल्याचं म्हटलं आहे. माझ्या अहवालात चूक झाली आहे. अपहरणाची कलमे जोडलेली नाहीत. ही साधी कलमे आहेत. त्यामुळे आरोपींना तात्काळ जामीन मिळेल, असं त्यांनी म्हटलं आहे.