आराध्या बच्चन हिचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, काहीच तासात मिळवले लाखाहून जास्त व्ह्यूज (Watch Video)
आराध्या बच्चन (Photo Credits: Instagram)

इंडस्ट्री मधील कलाकारांपेक्षा अलीकडे त्यांचे लहानगे स्टार किड्सचं (Star Kids)  जास्त लाइमलाईट मध्ये जगताना पाहायला मिळतात. या सेलेब्रिटी किड्सचे सोशल मीडियावर असंख्य चाहते आहेत तसेच त्यांच्या नावाच्या फॅन पेजेसला देखील लाखो फॉलोअर्स पाहायला मिळतात. अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन (Aishwarya Rai Bachchan)  आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची कन्या आराध्या (Aaradhya Bachchan) ही देखील याला काही अपवाद नाही.  अलीकडे पार पडलेल्या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक शामक दावर(Shamak Davar)  यांच्या 'शामक दावर समर फंक शो (Shamak Davar Summer Funk Show) मध्ये देखील तिने आपल्या अल्लड नखऱ्यांनी स्टेजवर धमाल घडवून आणली. याबातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायर होताना दिसत आहे. ज्याला अवघ्या काहीच तासात एक लाखाहूनही जास्त व्हूयज आणि लाईक्स मिळाल्या आहेत.

आराध्या बच्चन डान्स व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

#aradhyabachchan cool entry today for @shiamakofficial #summerfunk25years @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

आराध्या बच्चन च्या या व्हिडीओ मध्ये आई ऐश्वर्या आणि वडील अभिषेक देखील आपल्या लाडक्या मुलीला प्रोत्साहन देताना पाहायला मिळतायत. ‘कान्स’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला रवाना होण्यापूर्वी ऐश्वर्या आराध्याचा डान्स पाहण्यासाठी पोहोचली होती.व्हिडिओमध्ये आराध्या गली बॉय सिनेमातील गाण्यावर थिरकताना दिसत आहे. डान्सबरोबरच सध्या सोशल मीडियावर आराध्याचा लूक देखील गाजतोय. गुलाबी रंगाचा फ्रॉक, त्यावर डेनिमचं जॅकेट आणि स्नीकर्स घातलेल्या आराध्या सोबत ऐश्वर्याने एक फोटो आपल्या इंस्टाग्राम वर पोस्ट केला आहे. ऐश्वर्या रायला 29 वर्षाचा मुलगा? नक्की काय भानगड आहे ते वाचा

 

View this post on Instagram

 

✨🥰❤️😍OURS...😘💖😇🌟🤗

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

यानंतर ऐश्वर्या आणि आराध्या दोघीही कान्स फिल्म फेस्टिवल साठी रवाना झाल्या. या फेस्टिवल मध्ये सोनेरी रंगातील ड्रेस मध्ये ऐश्वर्या आणि पिवळ्या रंगाच्या फुलांच्या ड्रेस मध्ये आराध्याचे फोटो देखील चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत.

 

View this post on Instagram

 

💖My Sunshine Forever☀️🌈✨ 💖LOVE YOU ❤️

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

या शोमध्ये आराध्याचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी ऐश्वर्या अभिषेक बच्चनसह , वृंदा राय, जया बच्चन आणि श्वेता बच्चन हजर होते.