मंत्री Aaditya Thackeray  HIV/AIDS पॉझिटीव्ह असल्याच्या Fake News; एका वृत्तवाहिनीचे स्क्रीनशॉट एडिट करून वायरल
Aaditya Thackeray| Photo Credits: Twitter

सोशल मीडीयामध्ये सध्या खोट्या बातम्या, अफवा झपाट्याने वायरल होत असल्याचं मागील वर्षभर लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी अनुभवलं आहे. अनेकदा टेक्नॉलॉजीच्या मदतीने फोटो मॉर्फ करून सोशल मीडियात खळबळजनक परिस्थिती बनवली जाते. असेच एक खोडसाळ वृत्त महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या बाबतीत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंना HIV/AIDS ची लागण झाल्याचं फेक वृत्त दिले जात आहे. पण यामध्ये काहीच तथ्य नाही. आदित्य ठाकरे यांना कोविड 19 ची लागण झाल्याच्या टीव्ही 9 भारतवर्ष च्या टेलिव्हिजन वरील बातमीच्या स्क्रिनशॉर्ट मध्ये मॉर्फिंग करून खोटे वृत्त (Fake News) देण्यात आले आहे.

मॉर्फ केलेल्या फोटोमध्ये @OfficeOfSid चा उल्लेख आहे. या अकाऊंटवर फोटो ट्वीट देखील करण्यात आला होता. मात्र आता हे ट्वीटर अकाऊंट तात्पुरते बंद करण्यात आले आहे. तशी माहिती अकाऊंटवर पाहता येत आहे. 

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी स्वतः 20 मार्च दिवशी संध्याकाळी त्यांची कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. यामध्ये कोविड 19 च्या सौम्य लक्षणांनंतर चाचणी केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं म्हटलं आहे. त्यांनी संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केले आहे. Aaditya Thackeray Tests Positive for COVID19: महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण; नागरिकांना केली 'अशी' विनंती.

आदित्य ठाकरेंच्या आरोग्याबाबतची खोटी वृत्त

काही ट्वीटर युजर्स कडून आदित्य ठाकरेंच्या आरोग्याबाबत खोटी वृत्त देणारी ट्वीट शेअर करण्यात आली आहेत.

आदित्य ठाकरे कोविड 19 पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाला 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हलवण्यात आले आहे. तर त्यानंतर सह्याद्री अतिथीगृह आणि वर्षा बंगला देखील सॅनिटाईज करण्यात आला आहे. ठाकरे कुटुंबामध्ये अन्य कोणीही कोरोनाबाधित नाही.

मुंबई सह महाराष्ट्रामध्ये कोरोना रूग्णसंख्येमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह कोरोना रूग्ण महाराष्ट्र राज्यात आहे. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा 215241 आहे.