![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/08/Chocolate-snow-in-Switzerland-380x214.jpg)
Snowing Chocolate In Switzerland: तुम्ही बालपणी ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ हे गाणं ऐकलं असेल तसचं गुणगुणलंही असले. या गाण्यात तुम्ही चॉकलेटचं घर कसं असेल, अशी कल्पनादेखील केली असेल. यातील काही चॉकलेट प्रेमींनी चॉकलेटचा पाऊस पडला तर किती मज्जा येईल, अशीही कल्पना केली असेल. तुम्हाला माहित आहे ? स्वित्झर्लंडमधील (Switzerland) एका शहरात चक्क चॉकलेटचा पाऊस पडला आहे. कदाचित हे ऐकून तुम्हाला खर वाटणार नाही. परंतु, हे सत्य आहे. मात्र, यामागे मोठं कारण आहे.
स्वित्झर्लंडमधील झुरिक आणि बासेल या दोन मोठ्या शहरांच्या मध्यावर असणाऱ्या ओल्टेन शहरामध्ये मंगळवारी चॉकलेटचा पाऊस पडला. या शहरामध्ये लिंथ अॅण्ड स्प्रुएन्गली ही चॉकलेट बनवणारी प्रसिद्ध कंपनी आहे. या कंपनीच्या व्हेटीलेटर सिस्टीममध्ये मंगळवारी तांत्रिक अडथळा आला. त्यामुळे कोको निब्सचे लहान लहान तुकडे भाजल्यानंतर ते थंड करण्यासाठी वापरण्यात येणारे कुलींग व्हेटींलेटर्स खराब झाले. (हेही वाचा - लालबागचा राजा 2020, मुंबईचा राजा 2020 गणपती First Lookच्या नावाने खोटे फोटोज सोशल मीडियात व्हायरल; जाणून घ्या गणेशगल्लीच्या बाप्पाचं यंदा कुठे घेऊ शकता दर्शन!)
परिणामी कोकोपासून चॉकलेट बनवलं जातं ती कोको पावडर व्हेंटिलेटरच्या माध्यमातून कारखान्याबाहेर फेकली गेली. त्यामुळे लिंथ चॉकलेट बनवण्यासाठी वापरण्यात येणारे मुख्य घटक कंपनीच्या जवळच्या परिसरात पसरले. वाऱ्याच्या झोताने ही पावडर आजूबाजूच्या शहरांमध्ये पसरली. त्यामुळे स्वित्झर्लंडमधील काही शहरातील नागरिकांच्या घरांच्या खिडक्यांवर तसेच गाड्यांवर कोको पावडरचे छोटे छोटे कण दिसून आले. तसेच काही ठिकाणी हे कण बर्फामध्ये मिसळलेले पाहायला मिळाले.
कोको पावडर बर्फात मिसळल्याने येथील नागरिकांना स्वप्नातील चॉकलेटचा पाऊस अनुभवायला मिळाला. सोशल मीडियावर या घटनेचे अनेक फोटो तसेच व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ट्विटरवर एका पांढऱ्या गाडीच्या बोनेटवरील कोको पावडरचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. (हेही वाचा - Bahrain च्या दुकानात दोन महिलांकडून गणेश मूर्तींची तोडफोड; सोशल मिडियावर नेटिझन्सच्या संतापानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल)
A glitch at a Lindt chocolate factory in Switzerland meant that it started snow.....chocolate!! 😋🍫
Covering the town of Olten in a blanket of cocoa goodness. Who wants to move there?! #BigBreakfast pic.twitter.com/HZLC9zRRXS
— 98FM (@98FM) August 19, 2020
It’s snowing chocolate in Switzerland and I’ve never been more proud to be half Swiss. 2020 is saved.. pic.twitter.com/Q20wYH8Ntg
— Nathalie with an h (@nnnatchos) August 19, 2020
दरम्यान, व्हेंटीलेटर बिघाडामुळे कंपनीच्या चॉकलेट निर्मितीवर जास्त परिणाम झाला नाही. याशिवाय हवेत पसरलेली कोको पावडर हानीकारक नाही, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. सध्या सोशल मीडियावर स्वित्झर्लंडमधील चॉकलेटचा पाऊस चांगलाचं व्हायरल होत आहे.