Bahrain च्या दुकानात दोन महिलांकडून गणेश मूर्तींची तोडफोड; सोशल मिडियावर नेटिझन्सच्या संतापानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Bahrain women break Ganesha idols (Photo Credits: Video Grab)

सध्या बहरिनचा (Bahrain) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात हिंदूंच्या भावनांची पायमल्ली होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, दोन बुरखा घातलेल्या महिला दुकानदाराशी वाद घालताना आणि स्टोअरमध्ये हिंदू देवता का आहेत? असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे त्यानंतर त्यांनी गणेशमूर्तींची (Ganesha Murtis) तोडफोडही केली आहे. ही सर्व घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. हा व्हिडिओ ऑनलाइन दिसून आल्यावर अनेक नेटिझन्सनी आपला राग व्यक्त करायला सुरुवात केली होती. अनेकांनी या गोष्टीचा तीव्र निषेध केला होता.

त्यानंतर पोलिसांनीही त्वरित कारवाई केली असून एका 54 वर्षीय महिलेवर तिच्या कृत्याबद्दल खटला दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात कारवाई करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने ट्विटरवरुन दिली. गणेशोत्सव हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणावेळी गणपतीच्या मूर्तींचे महत्व लक्षात घेता, जगभरातील अनेक स्टोअरमध्ये गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. बहरिनची राजधानी मनमाच्या (Manama) जुफेर शेजारच्या एका सुपरमार्केटमध्ये ही घटना घडली.

व्हिडिओमध्ये दोन महिला गणपतीच्या मूर्तींच्या कपाटजवळ वाद घालताना दिसत आहेत. त्यानंतर त्या स्टोअर अधिकाऱ्याशीही वाद घालू लागतात आणि मूर्ती तोडू लागतात.

 

व्हिडिओ जेव्हा सोशल मिडियावर अपलोड केले गेले त्यानंतर नेटिझन्सनी या कृत्याबाबत संताप व्यक्त करायला सुरुवात केली. अनेकांनी याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी केली होते. त्यानंतर बहरिन पोलिसांनी या प्रकरणी त्वरित कायदेशीर कारवाई केली आहे. (हेही वाचा: भारतीय 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेची प्रसिद्ध Empire State Building उजळली तिरंगी रंगात (Watch Video)

बहरिनच्या गृहमंत्रालयाने पुष्टी केली की महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून द्वेषयुक्त गुन्हे घडवून आणणाऱ्या धार्मिक असहिष्णुतेबद्दल आपण अनेक घटना पहिल्या असतील, ही गोष्ट त्यामध्ये एक भर आहे.