Fake Photo Lalbaghcha Raja 2020 First Look | Photo Credits: Twitter

Lalbaugcha Raja First Look 2020 Fake Message:  महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसच्या सावटामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय मुंबईमध्ये अनेक सार्वजनिक गणेशोत्सव गणपती मंडळांनी घेतला आहे. दरम्यान मुंबई म्हटली की गणेशोत्सवाच्या काळात 24 तास गणरायाच्या भाविकांची धामधूम असते. प्रामुख्याने लालबाग, परळ, चिंचपोकळी, गिरगाव या भागांत गल्लोगल्ली गणपती असतात पण यंदा गणेशोत्सवात असा थाट नसेल. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आता 4 फूटांची गणेशमूर्ती आणण्याचं बंधन असल्याने सार्वजनिक मंडळांना देखील तो नियम लागू असेल. त्यामुळे लालबागचा राजा  (Lalbaughcha Raja) विराजमान न करता आरोग्य उत्सव साजरा होईल आणि मुंबईचा राजा (Mumbai Cha Raja) म्हणून शान मिरवणारा गणेशगल्लीचा गणपती देखील उत्सवमुर्ती न आणता केवळ पूजेसाठी 4 फूटांची आणणार आहे. मात्र सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर, ट्वीटर वर  लालबागचा राजा 2020  फर्स्ट लूक (Lalbaughcha Raja First Look) म्हणून काही फोटो व्हायरल होत आहेत.  ते खोटे आहेत. कारण लालबागचा राजा यंदा गणेशोत्सवाऐवजी आरोग्य उत्सव साजरा करत आहे. तर सध्या लालबागचा राजा 2020 नावाने व्हायरल होत असलेला फोटो  मुंबईचा राजा गणेश गल्ली (Ganesh Galli) चा आहे. Mumbaicha Raja & Chintamani's First Look: चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा गणेशगल्ली 2020 चा First Look जारी; इथे पहा फोटोज!

लालबागचा राजा 2020  व्हायरल फोटो 

मुंबईचा राजा 2020 चं दर्शन कुठे घ्याल?

मुंबईचा राजा गणेशगल्ली मधील गणपती यंदा भव्य स्वरूपात नसेल. मात्र पूजेसाठी 22 ऑगस्ट पासून एका 4 फूटाच्या गणेशमूर्तीचं पुजन केले जाणार आहे. दरम्यान त्याचं दर्शन जगभरातील गणेशभक्तांना ऑनलाईन माध्यमातून घेता येणार आहे. त्यासाठी गणेश गल्लीच्या फेसबूक, इंस्टाग्राम पेजवर खास स्ट्रिमिंग लिंक शेअर केली जाणार आहे.

Mumbai Cha raja

 

मुंबईचा राजा 2020 First Look 

लालबागचा राजा

सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याची इच्छा असते. यंदा लालबागचा राजा मंडळात विराजमान केला जाणार नाही. त्याऐवजी लालबाग मध्ये राजाच्या भक्तांसाठी आरोग्योत्सव सुरू झाला आहे. 3 ऑगस्ट पासून प्लाझ्मा दान, रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. Ganeshotsav 2020: मुंबई मध्ये लालबागचा राजा मंडळ यंदा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करून रक्तदान, प्लाझ्मा डोनेशन कॅम्प सह आरोग्य उत्सव आयोजित करणार.  

महाराष्ट्रात 22 ऑगस्टला गणरायाच्या मूर्तीचं आगमन होईल. तर 1 सप्टेंबर पर्यंत म्हणजे गणेशोत्सवात अनंत चतुर्दशी पर्यंत बाप्पा विराजमान असेल. मुख्यमंत्र्यांनी घरगुती सोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देखील साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत शक्य असल्यास भाविकांना ऑनलाईन दर्शन खुलं करण्याचं आवाहन केले आहे. त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेचा खेळणार्‍या काही खोट्या मेसेजेस, लिंकला भुलून जाऊ नका.  यंदा घरीच राहून गणेशोत्सव साजरा करा.