Ganeshotsav 2020: मुंबई मध्ये लालबागचा राजा मंडळ यंदा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करून रक्तदान, प्लाझ्मा डोनेशन कॅम्प सह आरोग्य उत्सव आयोजित करणार
Lalbaugcha Raja File Image (Photo Credits-Facebook)

Lalbaughcha Raja 2020:  मुंबईत लालबागच्या चिंचोळ्या गल्लीमध्ये दरवर्षी लालबागच्या राजाच्या (Lalbaughcha Raja) दर्शनाला तासोनतास भक्तांची रांग असते. मात्र यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (Lalbaughcha Raja Ganeshotsav Mandal) लालबागचा राजा गणेशोत्सव रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यंदा या मंडळाच्या 87 व्या वर्षी "लालबागचा राजा आरोग्य उत्सव" साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी अशा 11 दिवसांमध्ये हे मंडळ रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी उपक्रम घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. तसेच कमाल 4 फूटाच्या मूर्त्या ठेवण्याचं देखील आवाहन केलं आहे.

लालाबागचा राजा यंदा गणेशोत्सवानिमित्त गणेश मूर्ती स्थापना किंवा विसर्जन असा कोणताही कार्यक्रम करणार नाही. त्याऐवजी रक्तादानाचा मोठा उपक्रम राबवणार आहेत.  दरम्यान यंदा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून भव्य स्वरूपात गणेश चतुर्थीचा सण साजरा करण्याऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत दिली जाईल. तसेच LOC, LAC वर शहीद झालेल्या कुटुंबीयांनादेखील आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतल्याचं लालाबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे सेक्रेटरी सुधीर साळवी यांनी म्हटलं आहे. Ganesh Chaturthi 2020: 'उंची नाही तर भक्ती महत्त्वाची, मूर्ती 4 फुटापर्यंत असावी', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन.

राज्य शासनाकडून रक्ताची कमतरता जाणवत असल्यानंतर आवाहन करताच 1546 रक्तदात्यांनी रक्तदान करून मंडळाने पुढाकार घेतला. यासोबतच कोरोना संकटकाळात जनता क्लिनिक माध्यमातुन Ambulance, डॉक्टर मदतीने जनता क्लिनिक दक्षिण मध्य मुंबईत राबविले

मंडळाचे डायलिसिस सेवा देखील या काळात सुरू ठेवली.

दरम्यान यंदा मुंबईमध्ये गणेशगल्ली, नरे पार्क, गिरगावचा राजा अशा अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील यंदाचा गणेशोत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर जीएसबी वडाळा गणेश मंडळ यावर्षी भाद्रपद ऐवजी माघी गणेशोत्सव साजरा करणार आहेत.