CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

Ganeshotsav 2020: येत्या गणेशोत्सवात मंडळांनी चार फूटांपेक्षा जास्त उंच असलेल्या मूर्ती बसवू नयेत, असे मत महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दरवर्षी थाटामाटात साजरा केला जाणारा गणेशोत्सव (Ganeshotsav) यंदा कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करावा असं आवाहन ठाकरे यांनी यापूर्वी केले होते. 22 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे आणि मुंबईत उंच गणेश मूर्ती विशेष लोकप्रिय आहेत. निवेदनात ठाकरे म्हणाले की, मूर्तीच्या उंचीपेक्षा विश्वास आणि भक्ती महत्त्वाची आहे. कोरोना व्हायरस महामारीने संस्कृती आणि परंपरा प्रभावित झाली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, "गर्दी टाळण्यासाठी सर्व धर्मस्थळे बंद केली गेली आहेत. मुंबई आणि पुण्यात मोठ्या संख्येने गणेशमूर्ती पाहण्यासाठी जमलेली गर्दी आपण टाळली पाहिजे. मी गणेश मंडळांशी बोललो आहे आणि शिस्त व सामाजिक जबाबदारी सांभाळण्यास ते एकमत आहेत." (Ganesh Chaturthi 2020: ‘गिरगावचा राजा’ गणेशमंडळाचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 21 फुटाची गणेश मुर्ती न बसवण्याचा निर्णय, भक्त करू शकणार ऑनलाईन दर्शन)

मोठ्या मूर्तींना उचलण्यासाठी अधिक स्वयंसेवकांची आवश्यकता असल्याने मंडळांच्या गणेश मूर्ती चार फूटांपेक्षा जास्त उंच नसाव्यात, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई आणि पुण्यातील गणेश मूर्ती पाहण्यासाठी दरवर्षी लाखो भाविकांची 11 दिवसांपर्यंत गर्दी होती. "श्री गणरायांचे आगमन नेहमीच्या परंपरेनेच होईल व त्यांचे आगमन महाराष्ट्राचे मांगल्य आणि संस्कारास बळ देईल. कोरोनाचे संकट तात्पुरते आहे. गणरायाच्या कृपेने या विघ्नाचेही विसर्जन होईल, असे ठाकरे म्हणाले.

दरम्यान, कोरोनामुळे यंदा आषाढीचा भव्य पालखी सोहळा आणि लाखो वारकऱ्यांची पंढरी वारीही रद्द करण्यात आली. पण, पालखीची परंपरा न मोडता हे केले. मुंबईतील ‘गोविंदा उत्सव’ म्हणजे दहीहंडीही रद्द केले गेले आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, जे मोठ्या उत्साहाने दहीहंडीचे आयोजन करतात त्यांनी यंदा कोरोना मदतनिधीसाठी एक कोटी रुपये दिले असे ठाकरे यांनी नमूद केले.