Mumbaicha Raja and Chinchpoklicha Chintamani First Look 2020 (Photo Credits: Facebook/YouTube)

अवघ्या मुंबईला आतुरता लागून राहिलेल्या मुंबईचा राजा (Mumbaicha Raja 2020 First Look) आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचा (Chinchpoklicha Chintamani 2020 First Look) फर्स्ट लूक समोर आला आहे. यंदा कोरोना व्हायरसमुळे सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव हा सण अगदी साधेपणाने कऱण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा मुंबईचे मानाचे गणपती लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी यांच्या छोट्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. यात मुंबईचा राजा असलेल्या गणेश गल्लीचा गणपतीची यंदा उत्सव मूर्ती नसून 4 फूटाची मूर्ती असणार आहे असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. तर चिंचपोकळीच्या चिंतामणीची यंदा छोटी चांदीची मूर्ती असणार आहे. लालबागचा राजा 2020 First Lookच्या नावाने मुंबईचा राजा गणेश गल्ली गणपतीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; जाणून घ्या गणेशगल्लीच्या बाप्पाचं यंदा कुठे घेऊ शकता दर्शन!

मुंबईचा राजा फर्स्ट लूक पाहण्यासाठी पाहा हा व्हिडिओ:

तर चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लूक येथे पाहा

दरम्यान यंदा मुंबईमध्ये गणेशगल्ली, नरे पार्क, गिरगावचा राजा अशा अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील यंदाचा गणेशोत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर जीएसबी वडाळा गणेश मंडळ यावर्षी भाद्रपद ऐवजी माघी गणेशोत्सव साजरा करणार आहेत.

लालबागचा राजा यंदा गणेशोत्सवानिमित्त गणेश मूर्ती स्थापना किंवा विसर्जन असा कोणताही कार्यक्रम करणार नाही. त्याऐवजी रक्तादानाचा मोठा उपक्रम राबवणार आहेत. दरम्यान यंदा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून भव्य स्वरूपात गणेश चतुर्थीचा सण साजरा करण्याऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत दिली जाईल. तसेच LOC, LAC वर शहीद झालेल्या कुटुंबीयांनादेखील आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतल्याचं लालाबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे सेक्रेटरी सुधीर साळवी यांनी म्हटलं आहे.