First Human Dog: ऐकावं ते नवलचं! 20 हजार डॉलर्स खर्च करून जपानी व्यक्तीने केलं मानवी कुत्र्यामध्ये रूपांतर, Watch Video
First Human Dog (PC - Twitter)

First Human Dog: सुंदर दिसण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात, हे तुम्ही अनेकदा ऐकलं किंवा पाहिलं असेल. कोणी प्लास्टिक सर्जरी करतात तर कोणी महागडी कॉस्मेटिक्स खरेदी करतात. मात्र, जपानमधील एका व्यक्तीने कुत्र्यासारखे दिसण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.. होय हे खरे आहे. जपानमध्ये हे विचित्र प्रकरण समोर आले आहे, जिथे एका व्यक्तीने स्वतःला कुत्र्यासारखे दिसण्यासाठी 20 हजार डॉलर्स खर्च केले आहेत. टोको असं या व्यक्तीचं नाव आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा टोकोला यासंदर्भात विचारले तेव्हा त्याने सांगितले की, त्याला लहानपणापासूनच प्राण्यांसारखे जगायचं होतं आणि त्याला कुत्रे खूप आवडतात. म्हणूनच त्याने कुत्र्यासारखे दिसण्याचा विचार केला. आता त्याची इच्छा पूर्ण झाली आहे. जपानचा रहिवासी असलेला टोको हुबेहूब कुत्र्यासारखा दिसतो. त्याला पाहून तो मानव आहे, हे समजणे अवघड आहे. (हेही वाचा -Dog Attacks Boy Video: धक्कादायक! तेलंगणातील संगारेड्डी शहरात भटक्या कुत्र्यांचा अल्पवयीन मुलावर हल्ला; घटना CCTV मध्ये कैद)

दरम्यान, टोकोने एक सूट बनवला आहे जो परिधान केल्याने माणूस कुत्र्यासारखा दिसू शकतो. हा सूट खरेदी करण्यासाठी त्याने एकूण 11,63,000 रुपये भारतीय चलनात खर्च केले आहेत. हा सूट घातल्यानंतर, टोको आता पूर्ण कुत्र्यासारखा दिसतो. हा सूट तयार करण्यासाठी सिंथेटिक फरचा वापर करण्यात आला आहे. आता टोकोचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रिपोर्ट्सनुसार, टोकोला सूट बनवण्यासाठी सुमारे 40 दिवस लागले. @toco_eevee या वापरकर्त्याने ट्विटरवर ही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. टोकोच्या झेपेट नावाच्या व्यावसायिक एजन्सीने पोशाख डिझाइन करण्यात मदत केली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जेपेट चित्रपट, जाहिराती, मनोरंजन सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात मूर्ती आणि विलक्षण पोशाख तयार करते. जेपेटचे बरेच पोशाख टीव्हीवर देखील पाहिले गेले आहेत.