Heart Attack While Dancing (फोटो सौजन्य - X/@SinghDeepakUP0

Heart Attack While Dancing: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) विदिशा (Vidisha) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीचा डान्स करताना मृत्यू झाला. एका लग्न समारंभात महिलांच्या संगीत कार्यक्रमादरम्यान, ही तरुणी स्टेजवर डान्स करताना अचानक पडली आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. डान्स करताना तरुणीला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला, ज्यामुळे ती स्टेजवर कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, ही तरुणी इंदूरची रहिवासी होती, ती तिच्या चुलत बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी विदिशा येथे आली होती. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, व्हिडिओमध्ये परिणीता नावाची एक तरुणी स्टेजवर एका गाण्यावर नाचताना दिसत आहे. यावेळी 'लहरा के बाल खाके' हे गाणे सुरू असल्याचा आवाज येत आहे. या गाण्यावर तरुणी डान्स स्टेप्स सादर करते, तेव्हा अचानक ती स्टेजवर कोसळते. (हेही वाचा -Heart Attack While Playing Cricket: क्रिकेट खेळताना 24 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; नाशिकमधील दहिवडी गावातील घटना)

परिणीता नाचत असताना स्टेजवर पडताच तिथे उपस्थित असलेल्या लोकांना सुरुवातीला काहीच समजले नाही. पण बराच वेळ काहीच हालचाल न झाल्याने लोक स्टेजवर आले आणि त्यांनी तरुणीला उचलण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (हेही वाचा -Heart Attack While Playing Cricket: षटकार ठोकताच हृदयविकाराचा झटका, जालना येथे क्रिकेट खेळताना 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू (VIDEO))

डान्स करताना हृदयविकाराचा झटका आल्याने तरुणीचा मृत्यू - 

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू -

तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की, तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. त्याच वेळी, कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की, परिणीता पूर्णपणे निरोगी होती, तिला कोणताही गंभीर आजार नव्हता. रविवारी दुपारी विदिशा येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीच्या मृत्यूनंतर लग्न समारंभात शोककळा पसरली.