पाकिस्तानातील 2 फूट उंची असलेल्या नवरदेवाला मिळाली 6 फूट उंच सुंदर नवरी; पाहा व्हिडिओ
Burhan Chishti Marriage (PC - Twitter)

विवाह हा हिंदू धर्मात 15 वा संस्कार मानला जातो. त्यामुळे आपला जोडीदार निवडताना विशेष काळजी घेतली जाते. विवाह जमवताना मुले किंवा मुली आपल्यापेक्षा सुंदर दिसणाऱ्या साथीदाराची निवड करत असतात. सध्या सोशल मीडियावर पाकिस्तामधील एका जोडप्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. पाकिस्तानमधील 2 फूट उंची असलेल्या नवरदेवाला 6 फूट उंच सुंदर नवरी मिळाली आहे. पाकिस्तानच्या बुरहान चिश्तीची (Burhan Chishti) उंची 2 फूट इतकी आहे.

बुरहानचं लग्न 6 फूट उंच फौजिया या मुलीसोबत झालं आहे. (हेही वाचा - कोलंबिया: आश्चर्यम्! महिलेने दिला गर्भवती नवजात बालकाला जन्म, डॉक्टर्स झाले थक्क) विशेष हा विवाह अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे. त्यामुळे या विवाहातून समाजात वेगळा संदेश पसरण्यास मदत होत आहे. केवळ सुंदर दिसणं गरजेचं नसून आपले विचारही सुंदर असणं महत्त्वाचं आहे. हे लग्न नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे पार पडलं. या लग्नात 13 देशांच्या लोकांनी सहभाग घेतला होता. चिश्तीला लहानपणी पोलिओ झाला होता. तो लहानपणापासून ओस्लोमध्ये राहतात. त्याला सर्वजण लाडाने चिश्ती म्हणतात. चिश्ती नॉर्वेमध्ये अभिनेता सलमान खानच्या 'बीइंग ह्यूमन' कॅम्पेनचे प्रतिनिधीत्व करतात. विशेष म्हणजे बुरहान चिश्ती यांना 2017 मध्ये 'मोस्ट इंस्पिरेशनल मॅन' असा पुरस्कारदेखील मिळाला आहे. तसेच फौजिया या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील राहतात.

चिश्ती यांच्या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे लग्न अत्यंत धूमधडाक्यात झालं आहे. या लग्नाला मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती लाभली होती. यात परदेशातील नागरिकांचा मोठा सहभाग होता.