कोलंबिया: आश्चर्यम्! महिलेने दिला गर्भवती नवजात बालकाला जन्म, डॉक्टर्स झाले थक्क
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: फाइल फोटो)

नवजात बालकाला जन्म दिल्यानंतर त्याच्या येण्याने घरात आनंदाचे वातावरण होऊन जाते. तसेच बालकाचे नाव काय ठेवायचे ते त्याच्या खोडकर स्वभावाचे सर्वांगीण कौतुक केले जाते. याच पार्श्वभुमीवर एका महिलेने चक्क गर्भवती नवाजात बालकाचा जन्म दिल्याची आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे. नवजात बालकाला जन्म दिल्याच्या एक दिवसानंतर या बाळाला अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. एका रेयर मेडिकल कंडीशनच्या कारणामुळे हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोलंबिया येथील बरानकिला मध्ये राहणारी महिला मोनिका वेगा हिने एका नवजात बालकाला जन्म दिला. या बेबीचे नाव तिने इत्जामरा असे ठेवले आहे. नवजात बालकाच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. द सन यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार मोनिका हिच्या डिलिवरी पूर्वी डॉक्टरांना अल्ट्रासाउंडच्या वेळी रेयर मेडिकल कंडीशनबाबत माहिती मिळाली. यामध्ये असे समोर आले की, महिलेच्या पोटात दोन umblilical cords आहेत. यावर डॉक्टरांनी हे शोधून काढले की, umblilical cords दोन जुळी मुले नाहीत. खरंतर नवजात बालकाने एका अविकसित भ्रुणाला तिच्या गर्भात अवशोषित केले आहे. या रेयर मेडिकल कंडीशनला Fetus In Fetu किंवा Parasitic Twin असे म्हटले जाते.(आश्चर्यम्! तलावात आढळला मानवी चेहरा असलेला मासा; टुरिस्टची उडाली भांबेरी Watch Video)

नवजात बालकाच्या जन्मानंतर डॉक्टरांनी सेक्शन सर्जरी केली. त्यावेळी डॉक्टरांना असे दिसून आले की, नवजात बालकाच्या पोटात एक पॅरासेटिक ट्वीन आबे, मात्र या ट्वीनचे हृदय किंवा मेंदूचा विकास झाला नव्हता. खरंतर अल्ट्रासाउंडच्या दरम्यान पॅरासेटिक ट्वीनबाबत समजते. मात्र काही अशी सुद्धा प्रकरणे आहेत त्यानुसार काही वर्षापर्यंत बाळ पोटातच वाढ झाली आहे.