Fish with a Human Face: चीनच्या कुनमिंग (Kunming, China) शहरातील तलावात मानवी चेहरा असलेला मासा आढळला आहे. असा विचित्र मासा बघून एका टुरिस्ट महिलेची पाचावर धारण बसली. हे शहर त्याच्या ग्रीन लेक, 17 व्या शतकात बांधलेले पार्क आणि 8 व्या शतकात बांधलेले बौद्ध मंदिर यांसाठी पर्यटनाचे आकर्षण आहे. हे दक्षिण चीनचे परिवहन केंद्र म्हणूनही ओळखले जाते. इथे जुन्या काळातील अनेक पूलही आहेत. ही टुरिस्ट महिला युरोपमधील होती, जी प्रसिद्ध ग्रीन लेक पाहण्यासाठी गेली होती. त्याच वेळी पाण्यात एक मानवी चेहरा असलेल्या मासा पोहताना तिने पहिला. हा मासा आपल्या कडेच पाहत आहे हे पाहून तिला धक्का बसला.
This fish has human face pic.twitter.com/tlQvRHMoFB
— lovepower (@fun4laugh2) November 10, 2019
त्यानंतर ताबडतोब तिने या माशाचा एक व्हिडीओ शूट केला, सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यानंतर या महिलेने बर्याच लोकांना त्याबद्दल विचारले. इतर अनेक पर्यटकांनी आपण या तलावामध्ये असे मासे पाहिले असल्याचे सांगितले. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, असे मासे कधीकधी सरोवरात दिसतात, परंतु आजपर्यंत त्यांनी कोणालाही काही नुकसान पोहचवले नाही. (हेही वाचा: मुंबईतील ससून बंदराजवळ सापडला एका दुर्मिळ मासा; वस्तुसंग्रहालयात करण्यात येणार जतन)
काही लोक त्याला डोळ्यांची फसवणूक म्हणतात. बर्याच वेळा कार्प फिश पाहिल्यावर असे भासते की त्यांचा चेहरा मानवी चेहऱ्यासारखा आहे. परंतु प्रत्यक्षात कोणताही मासा मनुष्य चेहऱ्याचा असू शकत नाही. दुसरीकडे या तलावाची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, यापूर्वीही अनेक पर्यटकांनी याबद्दल सांगितले असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी अशा माशाचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र या तलावात मासे पकडण्यास मनाई असल्याने हा मासा सापडू शकला नाही.