Shweta Thakare On Forbes Magazine | (Photo Credits: Representational Image)

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील श्वेता ठाकरे (Shweta Thakare) यांची अमेरिकन व्यावसायिक मासिकाने दखल घेतली आहे. उल्लेखनीय म्हणजे या मासिकाने त्यांचा फोटो मुखपृष्ठावर छापला आहे. फोर्ब्स (Forbes Magazine) असे या मासिकाचे नाव आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील या श्वेता यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. श्वेता ठाकरे आणि पंकज महल्ले हे ग्रामहीत नावाच्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम करतात. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील हे शेतकरी दाम्पत्य उच्चविद्याविभूषीत आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन फोर्ब्सने (Forbes Magazine December 2022) त्यांना मूखपृष्ठावर स्थान दिले आहे.

फोर्ब्सने डिसेंबर महिन्याचा अंक प्रसिद्ध केला आहे. या अंकात आशिया पॅसिफिक भागातील अकरा क्षेत्रातील तंत्रस्नेही उद्योजकांच्या यशोगाथांची माहिती देण्यात आली आहे. यात श्वेता ठाकरे आणि पंकच महल्ले या युवा शेतकऱ्यांच्या ग्रामहीत कंपनीचा समावेश आहे. ग्रामहीतसह या वेळी 100 कंपन्यांना स्थान देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय मासिकाने ठाकरे-महल्ले जोडीची दखल घेतल्याने जिल्ह्यातही त्यांचे कौतुक होत आहे. (हेही वाचा, Forbes India Rich List 2021: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानींचे स्थान कायम, जाणून घ्या फोर्ब्सच्या यादीतील भारतीयांची नावे)

गुंतवणूक, वित्त, विपणन अशा विविध विषयांवर विस्तृत माहिती आणि संशोधन प्रसिद्ध करणारे फोर्ब्स हे मासिक वर्षातून आठ वेळा प्रकाशित होते. या मासिकात तंत्रज्ञान, संप्रेशन,विज्ञान, राजकारण, कायदा यांसारख्या विविध क्षेत्रांशी आणि विषयांशी निगडीत माहिती प्रसिद्ध केली जाते. या मासिकात प्रसिद्ध होणारे लेख आणि माहिती यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद घेतली जाते. तसेच, या मासिकात नाव येणे प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे या मासिकात नाव यावे अशी अनेकांची इच्छा असते मात्र ते शक्य नसते. कर्तृत्व तसे असे तरच हे मासिक कामाची दखल घेते.