Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मध्य रेल्वेचा (Central Railway) मुंबई विभाग (Mumbai Division) प्रवाशांच्या सोयीसाठी डिजिटल मार्ग अवलंबत आहे. मध्य रेल्वेने आपल्या ग्राहकांना मोबाईल सेवा पुरवण्याच्या उद्देशाने एक मोबाइल अॅप्लिकेशन, यात्री अॅप (Yatri App) लॉन्च केले आहे. या अॅपद्वारे स्थानिक प्रवाशांना लोकल ट्रेनची सर्व माहिती लाईव्ह व वेळेवर मिळू शकणार आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. गाड्यांचे आगमन आणि प्रस्थान, गाड्यांची वेळ, तांत्रिक विलंब, बिघाड इत्यादी माहिती प्रवाशांना अॅपवर मिळू शकेल.

सीआरच्या एका वरिष्ठ पीआरओने सांगितले की, या अॅपद्वारे प्रवाशांना ट्रेन व त्यांचा प्रवास याबाबत वारीच माहिती अगदी हाताच्या बोटावर मिळेल. पुढील काही अपडेट्समध्ये वापरकर्त्यांना गाड्यांच्या अचूक स्थानांची माहिती देण्यासाठी काही नव्या सुधारणा केल्या जातील. याची टप्प्याटप्प्याने चाचणी सुरु असून सध्या ती बेलापूर, नेरल आणि खारकोपर येथे सुरु केली जाईल. याच्या रिझल्टनंतर ते सर्व गाड्यांमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य आणि मुंबईकरांसाठी सुलभ प्रवास, अशी वैशिष्ट्ये ध्यान्यात घेऊन हे अॅप डिझाईन केले आहे. यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत मिळेल. प्रवासी या अॅपचा वापर करून योग्य माहिती आणि गाड्यांविषयी थेट अपडेट मिळवू शकतात. हे अॅप तुम्हाला रेल्वेच्या नवीन घोषणा, अपडेटेड वेळापत्रक, रेल्वे धोरणे, स्टेशन सुविधा आणि इतरही अनेक गोष्टींची माहिती देईल. पहिल्या टप्प्यात गाड्यांविषयी माहिती, ई-गाड्यांचे आरक्षण इत्यादी माहिती दिली जाईल. (हेही वाचा: Koo App कडून 'हे' खास फिचर रोलआउट, मायबोलीत ट्रान्सलेट करता येणार)

रेल्वेच्या सध्याच्या अॅपशी तुलना करता, हे अॅप गाड्यांचा होणारा विलंब, पावसाळ्यादरम्यान रद्द होणाऱ्या लोकल ट्रेन आणि इतरही अनेक घटनांविषयीची माहिती देईल. प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या तपशीलांबाबत सतर्क केले जाईल. तसेच यामध्ये स्टेशनवरील फूट ओव्हरब्रिज, शौचालये, एस्केलेटर, वॉटर कूलर, व्हीलचेअर, प्रथमोपचार, प्रतीक्षालय आणि बुकिंग काउंटर यासारख्या सुविधांचीही माहिती असेल. अशाप्रकारे या अॅपद्वारे पुढील पाच वर्षांत विभागांचे 85 लाखांहून अधिक कमाई करण्याचे लक्ष्य आहे.