नवी मुंबई: लोकल पकडताना नवऱ्यासोबत ताटातुट झालेल्या महिलेवर 2 तासांमध्ये 3 जणांकडून बलात्कार
Gang Rape | File Image (Representational Image)

नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरात 19 फेब्रुवारीच्या रात्री एका वाट चुकलेल्या महिलेवर अवघ्या दोन तासांत वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेळा बलात्कार (Rape) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका रिक्षाचालकासह दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 19 फेब्रुवारी रोजी पीडित महिलेची आपल्या नवऱ्यासोबत ताटातुट झाली होती. या महिलेला रेल्वे स्थानकाजवळ सोडतो, असं सागत तिच्यावर दोनवेळा बलात्कार करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक मध्ये राहणारी पीडित महिला मुंबईतील घाटकोपर येथे आपल्या पतीसह गेली होती. मात्र, लोकल पकडताना त्यांची ताटातूट झाली. त्यानंतर पीडित महिला रात्री मुंब्रा रेल्वे स्थानकात उतरली. आपल्याकडे पैसे नसल्याने तिने कानातील सोन्याचे दागिने मुंब्रा येथे विकण्याचा प्रयत्न केला. परंतु, दागिने खरेदी करण्यास कोणीही तयार होत नसल्याने तिने एका रिक्षाचालकाला विनंती केली. या रिक्षाचालकाने पीडित महिलेला निर्मनुष्य ठिकाणी नेऊन बलात्कार केला. तसेच दागिने विकून पैसे आणून देतो म्हणून घटनास्थळावरून पळ काढला.  (हेही वाचा - मुंबईत रेल्वेच्या आरक्षित ई-तिकिटांचा काळाजाबार रेल्वे पोलिसांकडून उघडकीस, टोळीच्या सुत्रधराला अटक)

दरम्यान, पीडित महिलेने दागिने मिळवण्यासाठी स्कुटीवरून जाणाऱ्या दोघांना जवळच्या रेल्वे स्थानकात सोडण्याची विनंती केली. परंतु, या दोघांनी पीडित महिलेवर घणसोली हायवे जवळील झाडीत नेऊन बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिला घणसोली रेल्वे स्टेशनमध्ये पोहचली. तेथील प्रवाशांच्या मदतीने ती आपल्या घरी पोहचली. त्यानंतर तिने आपल्या कुटुंबियांना आपल्यासोबत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला. तसेच पीडित महिलेवर बलात्कार करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहे.