प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारतीय रेल्वेच्या माध्यमातून दिवसाला हजारोंच्या संख्येने नागरिक प्रवास करत असतात. तर सध्या डिजिटल पेमेंटला चालना मिळावी आणि रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचवा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ई-तिकिटींची सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे आता नागरिक ई-तिकिटांच्या माध्यमातून रेल्वेच्या तिकिट बुकिंग करण्याचा सुविधेचा लाभ घेऊ शकत आहेत. पण आता रेल्वेच्या ई-तिकिटांच्या काळाबाजाराचा रेल्वे पोलिसांना उघडकीस आणला आहे. तसेच या घोटाळ्यात सहभागी असलेल्या टोळीचा मुख्यसुत्रधार याला सुद्धा बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. घोटाळा करणारी टोळी यांचे मुंबई ते दुबई पर्यंत कनेक्शन असल्याची धक्कादायक बाब ही समोर आली आहे. रेल्वे पोलिसांकडून आरक्षित ई-तिकिटांमधून मिळणारा पैसा हा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचा दावा केला आहे, .

ई-तिकिट घोटाळा हा गेल्या 9 वर्षांपासून कार्यरत असल्याचे तपासातून समोर आले आहे. या काळाबाजारातून दलालांकडून तब्बस 27 हजारांपेक्षा अधिक तिकिटे जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत कोटींच्या घरात आहे. हा काळाबाजार समोर आल्यावर प्रवाशांची तिकिटे रद्द करण्यात आल्याने त्यांना मोठा फटका बसणार आहे. याबाबत आरपीएफचे महासंचालकांनी बुधवारी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत याची अधिक माहिती दिली आहे. तर ज्या नागरिकांना प्रवासाठी तिकिटांचे बुकिंग करायचे होते त्यांना तिकिटे मिळाली नाहीत. पण दलालांकडून तिकिटांसाठी अधिक पैसे आकारत ती तिकिटे खरेदी केली जात असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.(रेल्वे तिकिटांचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा काळा बाजार; गैरव्यवहाराचे धागेदोरे परदेशात)

काही दिवसांपूर्वीच आरपीएफकडून जोगेश्वरी स्थानकातून अनधिकृतपणे ई-तिकिटांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते. या व्यक्तीकडून गेल्या दोन वर्षांपासून हा काळाबाजार सुरु होता. तसेच प्रत्येक तिकिटावर 200 रुपये अधिक पैशांची वसूली या दलालाकडून करण्यात येत होती. मोहम्मद इमरान खान असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याच्याकडे रेल्वेकडून तिकिटे विक्री करण्याचा परवाना सुद्धा नसल्याची बाब समोर आली होती. या व्यक्तीकडून जवळजवळ 50 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती.