राज्यभरात थंडी (Maharashtra Winter) पडायला सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यात तापमानाने निचांक गाठला असुन थंडीने महाराष्ट्र गारठला आहे. हवामान विभागाकडून थंड संबंधीत विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. हिल स्टेशन असलेल्या भागात म्हणजेच लोणावळा (Lonavala), खंडाळा (Khandala), महाबळेश्वर (Mahabaleshwar), चिखलदरा (Chikhaldara) या भागात तर कडाडून थंडी पडताना दिसत आहे. तरी गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी या पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. यावर्षी राज्यभरात जोरदार पाऊस पडला असल्याने कडाक्याची थंडी पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी नाशिक (Nashik), नागपूर (Nagpur), पुणे (Pune), सातारा (Satara), हिंगोली या जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडताना दिसत आहे. महाबळेश्वरात तापमान 8 अंशांवर पोहोचलंय. तर वेण्णालेक 6 अंशांवर घसरलंय. तर नाशिक जिल्ह्यात तापमानात मोठी घसरण बघायला मिळत आहे.
सर्वत्र थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणावर जाणू लागला आहे. ग्रामीण भागातही शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे. तर शहरांमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकला (Morning Walk) जाणाऱ्या नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. तरी राज्यभरातील नागरिकांनी हुडहुडी भरली आहे. (हे ही वाचा:- Pune Weather Update: पुण्यात 11.2 अंश सेल्सिअस किमान तापमानासह खाली घसरले)
गेल्या आठवड्यापासून राज्यभरात थंडीची लाट निर्माण झाली असून सातत्याने तापमान घसरत आहे. तरी नागरीकांनी गरम कपडेसह विविध बाबींची काळजी घ्यावी. कारण सरदी पडसा येणाऱ्या दिवसात डोकवर काढण्याची शक्यता वर्तवम्यात येत आहे. कधी थंडी न जाणवणाऱ्या मुंबईसह (Mumbai) उपनगरात देखील सकाळी थंडी जाणवू लागली आहे.