माहिम विधानसभा मतदारसंघात झालेल्या दणदणीत पराभवामुळे चर्चेत आलेले मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव पुन्हा एकदा चर्चेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज ठाकरे यांच्यात शिवतीर्थ या निवासस्थानी आज (10 फेब्रुवारी) सकाळीच भेट झाली. या भेटीसाठी फडणवीस स्वत: गेले होते. या वेळी झालेली बैठक आणि चर्चा याचा तपशील बाहेर आला नसला तरी अमित ठाकरे (Amit Thackeray) भाजपच्या (BJP) पाठिंब्यावर विधानपरिषदेवर आमदार होणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, तीर्थरुपांच्या भेटीचा आणि आमित यांच्या संभाव्य आमदारकीचा काही संबध आहे का? याबाबत मनसेकडून मात्र अधिकृतरित्या कोणतही स्पष्टता आली नाही.
'सर्वोच्च पातळीवरील विषय'
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधान आले असले तरी, त्याचा तपशील बाहेर आला नाही. मात्र, मनसे नेते प्रकाश महाजन यांनी ही भेट आणि चर्चांबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, या भेटीबाबत अद्याप पुरेशी नाही. अमित ठाकरे यांना आमदारकी देण्याबाबतचा निर्णय पक्षामध्ये अतिशय उच्च पातळीवर घेतला जाणारा विषय आहे. त्यामुळे त्यावर कार्यकर्ते कोणीही भाष्य करणार नाहीत. या विषयाबाबतचा संपूर्ण निर्णय राज ठाकरे स्वत:च घेतील आणि तो संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल, असेही प्रकाश महाजन प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. (हेही वाचा, Devendra Fadnavis meet Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थवर दाखल, BMC निवणुकीसाठी जुगाड? राजकीय वर्तुळाच चर्चा)
भाजप नेते फक्त भेटतात पुढे काहीच होत नाही. त्यामुळे संघटनेतील कार्यकर्ते नाराज होतात. विधानसभा निवडणुकीत बाळ नांदगावकर यांचा पराभव झाला याचे दु:ख वाटते. राज ठाकरे यांचा एक स्वभाव आहे. शत्रू जरी त्यांच्या घरी गेला तरी ते त्याचे स्वागतच करतात. त्यामुळे या भेटीत नेमके काय झाले त्याबाबतचा तपशील अद्याप तरी उपलब्ध नाही, असे प्रकाश महाजन म्हणाले. (हेही वाचा, Mumbai MNS Melava: मुंबई मध्ये मनसे चा मेळावा संपन्न; विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर पहिल्यांदा जाहीर बोलताना राज ठाकरे यांचा 'भाजपा' वर हल्लाबोल)
'फक्त कार्यकर्ते नाराज होतात'
दरम्यान, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीस मुंबई महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. दोन शिवसेना आणि एका बाजूला भाजप यांच्यात महापालिका निवडणुकीत मनसेची साथ मिळाली तर भाजपसाठी बरेच काही गणित सोपे होऊन जाऊ शकते. शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दबावही कमी होऊ शकतो. सहाजिकच भाजपला आपली ताकद वाढविण्यासाठी ते फायदेशीर ठरु शकते. त्यामुळे भाजप मुंबईमध्ये नवा मित्र सोबत घेणार का? याबाबत मोठी उत्सुकता आहे.