Karim Lala (Photo Credits: WikiMedia Commons)

सध्या राजकीय वर्तुळात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अंडरवर्ल्डमधील गुंडांचे आणि राजकारण्यांचे संबंध यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानावर सर्वत्र खळबळ उडाली आहे. यात दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या ज्या गुंडाला भेटल्या होत्या असं संजय राऊतांनी सांगितले आहे ती व्यक्ती म्हणजे 'करीम लाला' (Karim Lala). या नावाचा उच्चार होताच अनेक राजकारण्यांची झोप उडाली. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या इंदिरा गांधी यांचा कुणा गुंडांसह भेटलेल्याचा उल्लेख करणे ही खरंच साधीसुधी गोष्ट नाही. सर्वच पक्षातील नेत्यांनी या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. कारण ज्या गुंडांसोबत त्यांचे नाव जोडलं गेले आहे त्या करीम लाला ने अंडरवर्ल्ड जगताचा एक काळ गाजवला होता. नेमका होता तरी कोण हा करीम लाला?

करीम लालाचा जन्म 1911 मध्ये अफगाणिस्तानच्या कुनार मध्ये झाला. करीम लाला यास पश्तून समुदायाचा 'शेवटचा राजा' असेही संबोधले जात होते.

अंडरवर्ल्ड डॉन म्हटलं की आपल्यासमोर हाजी मस्तान किंवा दाऊद या दोघांची नावं येतात. मात्र करीम लाला हा मुंबई गुन्हेजगतातला पहिला डॉन होता. हाजी मस्तानही करीम लालाचा उल्लेख डॉन असाच करत असे. 1933-34 दरम्यान मुंबईत आल्यानंतर मुंबईत आला. सुरुवातीला कुंटण खान्याला मुली पुरवण्याचा व्यवसाय त्याने केला. त्यानंतर तस्करी, जुगार या बेकायदा धंद्यामध्ये जम बसवण्यास करीम लालाने सुरुवात केली. करीम लाला गरजूंना मदतही करत असे. मात्र एक काळ असा होता की त्याच्या नावाने मुंबई अंडरवर्ल्ड थरथर कापत असे.

हेदेखील वाचा- संजय राऊत नरमले! 'इंदिरा गांधी' यांंच्या बद्दलचे वादग्रस्त विधान मागे

40 च्या दशकामध्ये हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार यांचं वर्चस्व प्रस्थापित होऊ लागलं. ज्यामुळे 40 च्या दशकानंतर करीम लाला, हाजी मस्तान आणि वरदराजन या तिघांचा प्रभाव होता.

करीम लाला आणि सिनेजगताचेही संबंध होते. इतकच काय तर अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमला ही करीम लाला बेदम मारले होते. 1981 मध्ये करीम लाला गँगने दाऊदचा भाऊ शब्बीर याची दिवसा ढवळ्या हत्या केली. ज्यामुळे चिडलेल्या दाऊदने गँगवॉर सुरु केलं. 1986 मध्ये दाऊदच्या गुंडांनी करीम लालाचा भाऊ रहीम खान याला ठार केलं आणि शब्बीरच्या खुनाचा बदला घेतला.

शेवटी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि चुकीच्या मार्गावर गेलेल्या करीम लालाचा शेवचही खूप वाईट झाला. 19 फेब्रुवारी 2002 ला मुंबईत त्याचं निधन झालं.