अनलॉक-2 म्हणजे काय? विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र सरकारला सवाल
Devendra Fadnavis (PC - ANI)

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘मिशन बिगिन अगेन’ (Mission Begin Again) अंतर्गत 3 जूनपासून राज्यातील अनेक निर्बंधाला शिथिलता देण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने आज 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनलॉक-2 बाबत प्रश्न विचारला आहे. अनलॉक 2 म्हणजे काय? त्याचा सुस्पष्ट खुलासा झालाच पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी गेल्या महिन्यात अनलॉक-1 ची घोषणा केली होती. दरम्यान, राज्यातील अनेक निर्बंध शिथील केले होते. राज्यात मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. यातच महाराष्ट्र सरकारने राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. तसेच अनलॉक- 2 च्या दुसऱ्या लवकरच सुरुवात होणार आहे. कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी मिशेन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात देण्यात आलेल्या सवलतींसह 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार. स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील, अशी माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रात आज 181 जणांचा कोरोनामुळे मृत्यू तर 5257 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट-

देशातील कोरोनाच्या एकूण मृत्यूपैकी 46 मृत्यू एकट्या महाराष्ट्रात असल्याने गंभीर परिस्थिती आहे. सरकारला रोखण्यासाठी प्रयत्न आणखी वाढवावे लागणार आहेत. राज्य सरकारला या स्थितीकडे अधिक गांभीर्याने पाहावे लागणार आहे. राज्य सरकारकडून महापालिकांना अजूनही आर्थिक मदत नाही, हे दुर्देवी आहे. यातून कोरोनाविरोधातील लढाई कमकुवत होईल. यामुळे राज्यातील कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज आहे, असे फडणवीस अकोला येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.