Maharashtra Rain | (Photo credit: archived, edited, representative image)

Maharashtra Monsoon Updates: नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून यंदा बऱ्यापैकी बरसण्याच्या मनस्थितीत दिसतो आहे. यंदा काहीसा लवकरच दाखल झालेला मान्सून राज्यभरात पसरला आहे. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी हलक्या ते मध्यम, तुरळक आणि मुसळधार (Rain Updates) अशा वेगवेगळ्या स्वरुपात पाऊस हजेरी लावतो आहे. राजधानी मुंबई शहरातही संततधार पावसाची उपस्थिती (Mumbai Rains) पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान अंदाज व्यक्त करताना यलो अलर्ट जारी करत आयएमडीने पुढचे चार दिवस महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. केवळ मुंबईच नव्हे तर मुंबईलगत असलेले जिल्हे, कोकण किनारपट्टी आणि लगतच्या काही भागांमध्ये पुढच्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याी शक्यता आहे.

कोणत्या ठिकाणी यलो अलर्ट?

आयएमडीने हवामान अंदाज व्यक्त करताना, म्हटले आहे की, मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टीवर पुढचे चार दिवस संततधार पावसाची उपस्थिती पाहायला मिळेल. त्यामुळे या भागांमध्ये आयएमडीने पावसाचा पिवळा इशारा (यलो अलर्ट) वर्तवला आहे. शिवाय मुंबई किनारपट्टीवरही पुढचे चार दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, असे आयएमडीने म्हटले आहे. (हेही वाचा, Mahrashtra Weather Update: पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भासह कोकणाला येलो अलर्ट)

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर

हवामान विभागाने म्हटले आहे की, पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा विशेष जोर पाहायला मिळेल. खास करुन पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूह जिल्ह्यांमध्ये पावसाची उपस्थिती पाहायला मिळेल. पाठिमागच्या आठवड्यात मान्सूनने काहीसी ओढ दिली होती. मात्र, ती ओढ अधीक ओढून न धरता पावसाने पुन्हा एकदा पुनरागमन करत उपस्थिती दर्शवली आहे. या आठवड्यात मोसमी वाऱ्यासाठी परिस्थिती अनुकुल आहे. परिणामी संपूर्ण आठवड्यातच रिमझीम पवासाची बरसात पाहायला मिळू शकते.

दरम्यान, यंदाच्या वर्षी मान्सून काही दिवस आगोदरच दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानेही यंदा सरासरीच्या तुलनेत पाऊस दमदार बरसेल असे भाकीत केले आहे. हे भाकीत खरे होताना दिसते आहे. एका बाजूला हे भाकीत खरे होत असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र परिस्थिती वेगळी आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही पावसाचा शिडकाव झाला नाही. त्यामुळे या ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती असून पाण्यासाठी नागरिकांची वनवण सुरु आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे यांसारख्या काही महत्त्वाच्या शहरांमध्येही पाणिकपात लागू करण्यात आली आहे. अर्थात, पावसाळ्याचे दिवस असल्याने अल्पावधीतच ही पाणीटंचाई दूर होऊ शकेल, असा प्रशासनाला विश्वास आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीमध्येही पाणी टंचाई शिगेला पोहोचली आहे.