कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivali) मध्ये येत्या मंगळवारी म्हणजेच 25 मे रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्राच्या यांत्रिक आणि विद्युत दुरुस्तीसाठी ही पाणीकपात करण्यात येणार असल्याचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) सांगितले आहे. दरम्यान नागरिकांनी या गोष्टीची दखल योग्य तो पाणीसाठा करुन पाणी जपून वापरण्याचे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे. येत्या 25 मे ला सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवलीकरांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी असून त्यांनी त्यानुसार पाण्याचे नियोजन करावे असे सांगण्यात येत आहे.हेदेखील वाचा- Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज 26,133 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद, राज्यात सध्या 3,52,247 ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु
मोहिली उदंचन केंद्र आणि जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीची कामे होणार असून 25 मे रोजी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे महापालिकेच्या मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुद्धी केंद्रामधून कल्याण (ग्रामीण) व डोंबिवली पूर्व-पश्चिम तसेच कल्याण पश्चिम विभागामधील भोईरवाडी, शहाड, रामबाग, चिकणघर, घोलपनगर, मिलिंदनगर, योगीधाम, मुरबाड रोड, अशोक नगर, वालधुनी, शिवाजी नगर, जोशी बाग, बिर्ला कॉलेज ते खडकपाडा रोड व कल्याण स्टेशन परिसर या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
नागारिकांनी पाण्याची पुरेसा साठा करुन ठेवावा व पाणी जपून वापरावे असे आवाहन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.