Nagpur Water Cut: नागपूरकरांसाठी (Nagpur) अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नागपूरमध्ये अत्यावश्यक देखभालीमुळे 6 जानेवारी रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा (Water Supply) 12 तासांसाठी तात्पुरता बंद राहील. यामध्ये दोन पाण्याच्या पाईपलाईन जोडण्याचा समावेश आहे. या काळात होणारी गैरसोय कमी करण्यासाठी बाधित भागातील रहिवाशांना पुरेसा पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील मदतीसाठी, 1800 266 9899 वर हेल्पलाइन उपलब्ध आहे.
प्रभावित क्षेत्रे -
यामुळे प्रताप नगर, खामला, राम नगर ईएसआर, चिंचभुवन एक्झिस्ट आणि एनआयटीसीए सोसायटी, मेहेर बाबा नगर, शांतीनिकेतन नगर, जुनी बस्ती, भारतीय सोसायटी, संताजी सोसायटी, मनीष नगर सोसायटी, आरटीओ सोसायटी, शुभांगी सोसायटी, शक्ती न्यू समर्थ सोसायटी, जय बद्रीनाथ सोसायटी, गिरी कुंज सोसायटी, इंगोले नगर, कन्नमवार नगर, कर्वे नगर, जीवन अक्षय सोसायटी येथे पाणीकपात होणार आहे. (हेही वाचा - Vande Bharat Train Maharashtra: पुणे ते हुबळी, नागपूर ते सिकंदराबाद, कोल्हापूर ते पुणे महाराष्ट्रात 3 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार; जाणून घ्या वेळापत्रक)
याशिवाय, समाज एकता सोसायटी, कृषी नारा सोसायटी, लघुवेतन सोसायटी, नगर नागरीक सोसायटी, श्याम नगर, प्रभू नगर, आणि संत तुकडोजी सोसायटी याठिकाणी देखील पाणीकपात होणार आहे. रहिवाशांनी त्यानुसार तयारी करावी असा सल्ला देण्यात आला आहे.