राज्यासह मुंबईतील (Mumbai) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता संसर्ग पाहता मंत्रालयातील (Mantralaya) जलसंधारण विभागाने (Water Conservation Department) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जलसंधारण विभागात आता दोन शिफ्टमध्ये काम करण्यात येणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 आणि दुपारी 12 ते रात्री 8 अशा दोन शिफ्ट करण्यात आल्या आहेत. या शिफ्टमध्ये विभागातील कर्मचाऱ्यांची वर्गीकरण करण्यात आले आहे. तसंच एका कर्मचाऱ्याला वर्क फ्रॉम होमची (Work From Home) मुभा देखील देण्यात आली आहे. या दोन शिफ्टमध्ये 15 मार्चपासून कामकाजाला सुरुवात होणार आहे. तसंच यामुळे कामावर काही परिणाम होत नाही ना? हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.
मंत्रालयातील मंत्री, कर्मचारी वर्गही कोरोनाच्या कचाट्यात सापडला आहे. तसंच मंत्रालयात कामासाठी हजर होताना लोकल, बसने प्रवास करावा लागतो. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढतो. तसंच सर्वजण एकत्र कामाच्या ठिकाणी आल्याने गर्दी होऊ शकते. या सगळ्याचा विचार करता शिफ्टचा पर्याय योग्य ठरु शकतो. (Maharashtra Police: कोविड-19 च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यालयीन वेळेत बदल; 'वर्क फ्रॉम होम'चाही पर्याय)
दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र मंत्रालयात शिफ्टमध्ये काम करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास इतर विभागातही असा निर्णय घेता येईल. (Mumbai Local प्रवासासाठी वेळेच्या निर्बंधामुळे व्यावसायिकांकडून कामकाजाच्या वेळेत बदल)
मुंबईसह राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्या मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे अनेक शहरं, जिल्हे येथे लॉकडाऊन, जनता कर्फ्यू, संचारबंदी यांसारखे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसंच लॉकडाऊनचा इशारा मुख्यमंत्र्यांकडून वारंवार दिला जात आहे. अशा परिस्थितीत गर्दी टाळणे, नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.