Asaduddin Owaisi (Photo Credit: ANI)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2019) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचार करताना दिसत आहे . यातच एआयएमआयएम (AIMIM) पक्षही या निवडणुकीत आपला जोर लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. एआयएमआयएम पक्ष प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांची शुक्रवारी एक सभा पार पडली. ओवैसी हे नेहमी त्यांच्या आक्रमक भाषणामुळे चर्चेत राहतात. परंतु, औरंगाबाद (Aurangabad) येथे पार पडलेल्या सभेवेळी ओवैसी यांनी डान्स करुन नव्या चर्चांना आमंत्रण दिले आहे. दरम्यान, ओवैसी यांचा अनोखा अंदाज पाहून अनेकजण आश्चर्यचकीत केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

एएनआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख ओवैसी सभा संपवून मंचावरुन खाली उतरताना डान्स करताना दिसले. त्यावेळी ओवैसी यांच्या हातात फुलांची माळ होती. दरम्यान, ओवैसी हे माळ तोडून फूल फेकताना दिसत आहे.ओवैसी  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधल्यानंतर असाप्रकारे आनंद साजरा केला. नरेंद्र मोदी हे विवादित विधान करुन देशात अशांतता पसरवण्याचे काम करत आहेत, असेही ओवैसी म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Maharashtra Assembly Elections 2019; प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

एएनआयचे ट्वीट-

1993 मध्ये जो बॉम्ब ब्लास्ट झाला, त्यामधील पीडितांना अजूनही न्याय नाही मिळाला असे नरेंद्र मोदी त्यांच्या प्रचार सभेत म्हणाले होते. यावर नाराजी व्यक्त करत ओवैसी यांनी औरंगाबाद येथील प्रचार सभेत एक प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी ते म्हणाले की, प्रकरण बंद गेले, आरोपींनी सजावट केली. परंतु मुंबई दंगोंवर श्रीकृष्ण समितीच्या अहवालाची अंमलबजावणी झाली नाही. आनंद मोदी का या काम करत आहेत? ''