Washim Rape Case: घरी एकटी असताना अल्पवयीन मुलीचा शेजारच्यानी घेतला फायदा, आरोपीला अटक; मालेगावातील धक्कादायक घटना
Stop Rape (Representative image)

Washim Rape Case:  वाशिम (Washim) जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या परिसरात एका अल्पवयीन मुलीवर शेजारच्या व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. वाशिम मधील या धक्कादायक घडनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रक्षाबंधनच्या दिवशी घडली. अल्पवयीन मुलगी घरात एकटी होती तेव्हा शेजारील व्यक्ती घरात येवून त्यांने तीच्यावर लैंगिक अत्याचार (Rape) केला. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच, आरोपीला तात्काळ अटक करण्यात आले.

मालेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव परिसरातअल्पवयीन मुलगीचा कुटूंब राहत होता. दुपारच्यावेळी शेतकरी कुटूंब असलेले तीचे आई वडिल शेतात गेले होते.त्यावेळी घरी एकटी असताना, शेजारील व्यक्ती घरी आला. याच गोष्टीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. तिच्यावर लैंगित अत्याचाक केला. पीडीत मुलगी 17 वर्षाची आहे. अशी माहिती पोलीसांनी दिली.

जेव्हा या मुलीची आई शेतातून घरी परतील तेव्हा पीडीत मुलगी पुर्ण घाबरली होती. आईने अनेक वेळा विचारणा केल्यावरही तीने काही सांगितली नाही. पीडीत मुलीच्या आईने इतर नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर मुलीने सर्व प्रकरण सांगितले. आईने आणि नातेवाईकांनी पोलीस स्टेशन गाठलं. पोलीसांना या घटनेचा माहिती दिली. उपस्थित महिला पोलीस उपनिरिक्षक यांनी तक्रार नोंदवून घेतली.हिला पोलीस उपनिरीक्षक सारिका यांनी त्या आईची तक्रार नोंदवून घेतली. पोलीसांनी आरोपीला तात्काळ अटक केले. चौकशी दरम्यान, आरोपीने दुसऱ्यांदा बलात्कार केल्याची माहिती मिळाली.  आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.