Nitesh Rane On Saif Ali Khan: कॅबिनेट मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan)वरील हल्ल्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याच्यावर खरोखरच चाकूने वार करण्यात आला की, तो फक्त अभिनय करत होता? असा प्रश्न आता नितेश राणे यांनी विचारला आहे. सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी कधीही हिंदू कलाकारांची काळजी केली नाही कारण त्यांना फक्त काही कलाकारांची काळजी आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, सैफ अली खानला मुंबईच्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या आठवड्यात वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सैफ त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी पोहोचताच त्याने माध्यमांना हात हलवून नमस्कार केला. यावेळी सैफ निरोगी दिसत होता. यावेळी करीना कपूर आणि करिश्मा कपूरही सैफसोबत निवासस्थानी दिसले. सध्या अभिनेत्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. (हेही वाचा -Saif Ali Khan Gets Discharged From Hospital: हल्ल्यानंतर अखेर सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज; पूर्ण विश्रांतीचा सल्ला)
हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी -
गेल्या आठवड्यात चोरीच्या कथित उद्देशाने सैफ अली खानच्या घरात घुसखोर घुसला होता. त्यानंतर त्याने पैशाची मागणी करत सैफवर हल्ला केला. या हल्ल्यात सैफला सहा ठिकाणी गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. येथे त्याच्यावर पाठीत खुसलेला चाकूचा तुकडा काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. (हेही वाचा: Saif Ali Khan Attack Case मध्ये आरोपी Mohammad Shariful Islam Shehzad चा छडा लावणार्या 75 जणांच्या टीमचे Joint CP Satyanarayan Chaudhary कडून विशेष कौतुक)
हल्लेखोराला अटक -
दरम्यान, पोलिसांनी हल्ल्यानंतर दोन ते तीन दिवसात हल्लेखोराला अटक केली. तसेच त्याने अभिनेत्यावर हल्ला का केला? याचा तपास सध्या मुंबई पोलिस करत आहेत. सैफवर झालेला हल्ला संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरला. तथापी, सैफचे चाहते त्याची प्रकृती लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.