राग आणि भीक माग' ही म्हण नवी नाही. या म्हणीची प्रचीती वर्धा जिल्ह्यात आली आहे. केवळ जेवण वाढण्यास उशीर झाल्याने संतापलेल्या बापाने सेंट्रींगची पाटी डोक्यात घालून पोटच्या मुलीची हत्या (Wardha Murder) केली आहे. ही घटना हमदापूर (Hamdapur Village) येथे घडली. घडल्या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली. मुलगी अल्पवयीन असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. देहगाव पोलिसांनी वडिलाला ताब्यात घेतले आहे.
घटनेबद्दल माहिती अशी की विलास ठाकरे आणि त्याची 17 वर्षीय मुलगी एकत्र जेवण करायला बसले होते. या वेळी काही कारणामुळे दोघांमध्ये वाद झाला. त्यातून वडीलांना जेवण वाढण्यास मुलीला उशीर झाला. इतक्या क्षुल्लख कारणावरुन संतापलेल्या विलास ठाकरे यांने जवळच पडलेली सेंट्रींगची पाटी उचलली मुलीच्या डोक्यावर प्रहार करण्यास सुरुवात केली. सेंट्रींगच्य पाटीचा डोक्याला जबर मार लागल्याने मुलगी गंभीर जखमी झाली. मध्यस्तीसाठी गेलेल्या मुलीच्या आईने (विलासची पत्नी) तिला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ती मुलीला वाचवू शकली नाही. (हेही वाचा, Murder: बायकोचा राग काढला चिमुकल्यांवर, दारूच्या नशेत तीन मुलांची हत्या)
आशा ठाकरे यांनी घडल्या प्रकाराची माहिती फोन करुन वर्था येथील सिंधी मेघे परिसात राहणारा तिचा भाऊ प्रमोद राम महाडोळे याला दिली. भाचीच्या जीवार उठेल्या दाजीबद्दल कळताच मामा धावून आला. तोपर्यंत घटनेची माहिती गावात पसरली होती. या घटनेची माहिती पोलिसांनाही कळली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मुलीचा मृतदेह शविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाला पाठवला. आरोपी असलेल्या वडीलांना अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.