Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

वर्धा (Wardha) जिल्ह्यातील हिंगणघाट (Hinganghat) येथे सोमवारी एका प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ वर्धा बंदची (Wardha Bandh) हाक देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटला असून आरोपीच्या कृत्याचा राज्यभरातून तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी जात आहे. याआधीही 4 फेब्रुवारीला या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीयांकडून हिंगणघाट बंद पुकारण्यात आला होता. यातच पीडितेला न्याय मिळावा, यासाटी विद्यार्थी, सर्वपक्षीय नागरिक आणि समाजिक संघटनाही रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हिंगणघाट येथील प्रकरण ताज असताना औरंगाबादमध्येही बारचालकाने एका महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. या घटनेत ही महिला 95 टक्के भाजली असून बुधवारी संध्याकाळी उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. आजच्या सर्वपक्षीय मोर्चात हिंगणघाट येथील प्राध्यापिका आणि औरंगाबाद येथल्या महिला जळीत प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात येईल. या दोन्ही घटनांवर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त करण्यात आला. यावर अनेक राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली. या घटनमुळे महिलांच्या सुरक्षाबाबात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे देखील वाचा- 'राक्षसी प्रवृत्तीला संपवण्याची वेळ आता आली आहे' असे ट्विट करत उदयनराजे भोसले यांनी हिंगणघाट आणि औरंगाबाद घटनेचा तीव्र शब्दांत केला निषेध

प्राध्यापक तरूणीवर तरूणीवर सध्या नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तरुणी सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.तिची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या हल्ल्यात पीडितेचा चेहरा कोळश्यासारखा झाला असल्याची माहीती डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीनच्या माध्यमातून केली आहे.