'राक्षसी प्रवृत्तीला संपवण्याची वेळ आता आली आहे' असे ट्विट करत उदयनराजे भोसले यांनी हिंगणघाट आणि औरंगाबाद घटनेचा तीव्र शब्दांत केला निषेध

"राक्षसी प्रवृत्तीला संपवण्याची वेळ आता आली आहे," असे ट्विट शेअर करत या घटनांबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे अशी जनभावना तयार होत असल्याचंही यात म्हटलं आहे.

'राक्षसी प्रवृत्तीला संपवण्याची वेळ आता आली आहे' असे ट्विट करत उदयनराजे भोसले यांनी हिंगणघाट आणि औरंगाबाद घटनेचा तीव्र शब्दांत केला निषेध
Udayanraje Bhosale | (Photo Credits: ANI)

हिंगणघाट प्रकरण ताजं असताना आज झालेल्या औरंगाबादेतील घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या घटनेत महिलेच्या घरात शिरून तिला जिवंत जाळल्याची घटना घडलीय. या घटनांचा भाजपा नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. "राक्षसी प्रवृत्तीला संपवण्याची वेळ आता आली आहे," असे ट्विट शेअर करत या घटनांबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे अशी जनभावना तयार होत असल्याचंही यात म्हटलं आहे. हिंगणघाट (Hinganghat) येथे एकतर्फी प्रेमातून माथेफिरू तरुणाने शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही पीडिता जीवन-मृत्यूशी संघर्ष देत आहे. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या दोन्ही घटनेतील महिला 95% भाजल्या असून दोघीही मृत्यूशी झुंज देत आहेत. दोन घटनांमधील आरोपींना अटक करण्यात आली आहे. उदयनराजे यांनी दोन्ही घटनांवरुन संताप व्यक्त करत ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “माणुसपणाला काळीमा फासणारी घटना हिंगणघाट तसंच औरंगाबाद येथे घडली. तरुण प्राध्यापिका व आज औरंगाबाद येथील महिलेला जिवंत जाळण्यात आले. या राक्षसी प्रवृत्तीला संपवण्याची वेळ आता आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे अशी जनभावना तयार झाली आहे”.

पाहा ट्विट:

हेदेखील वाचा- हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी मृत्यूशी झुंज देण्याऱ्या पीडित तरुणीला मुख्यमंत्रीनिधीतून मदत जाहिर

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी संतोष मोहिते या तरुणाला अटक केली आहे. ५० वर्षीय पीडित महिला ही गंभीररित्या भाजली असून तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

तर दुसरीकडे हिंगणघाट मध्ये एकतर्फी प्रेमातून माथेफिरू तरुणाने जाळल्यामुळे जीवन-मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या तरुणीवर नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Feb 05, 2020 04:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).