Wall Collapses प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - ANI)

Bhiwandi House Collapse: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) भागात रविवारी सकाळी वादळी हवामानामुळे घराची भिंत कोसळून(Wall Collapse) एका आई आणि तिच्या एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पाथरेडी गावात ही घटना घडली. आई आणि मुलगी झोपेत असताना मातीच्या घराची भिंत त्यांच्यावर पडली. तथापि, या घटनेत महिलेचा पती गंभीर जखमी झाला.

राहुल (25) नावाच्या एका जखमी व्यक्तीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिसरातील एका स्थानिकाने सांगितले की, सकाळी वारा वेगाने वाहत होता, ज्यामुळे घर कोसळले. जोरदार वारा आल्याने घराची भिंत कोसळली. (हेही वाचा -Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्रात मान्सून तळ कोकणामध्ये दाखल; दरवर्षी च्या तुलनेत 10-12 दिवस आधीच आगमन)

भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवारी मुंबई महानगर प्रदेशात (MMR) पुढील दोन दिवसांत मान्सूनची घोषणा केली. महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती आता अनुकूल आहे आणि पुढील दोन-तीन दिवसांत त्याची सुरुवात होण्याची अपेक्षा आहे, असे आयएमडीने आपल्या अंदाजात म्हटले आहे. (हेही वाचा -Maharashtra Weather Forecast: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट, अति मुसळधारेचा इशारा; मुंबई, ठाणे, पालघर यलो अलर्ट वर)

दरम्यान, मुंबई आणि ठाणे येथे बुधवारपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. जो वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दर्शवितो. हवामान खात्याने पुढील 24 तासांत रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.