Rain | Pixabay.com

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) दरवर्षी 7 जून च्या आसपास दाखल होणारा मान्सून (Monsoon) यंदा 10-12 दिवस आधीच दाखल झाला आहे. महाराष्ट्रात आज तळ कोकणामध्ये मान्सून दाखल झाला आहे. काल केरळ (Kerala) मध्ये दाखल झालेला मान्सून 1-2 दिवसात महाराष्ट्रात असा अंदाज असताना आज 25 मे दिवशी कोकणात मान्सून दाखल झाला आहे. तसेच मान्सूनच्या प्रवासासाठी वातावरण देखील अनुकूल असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. आज सकाळपासूनच मुंबई, उपनगर आणि ठाणे भागात ढगाळ वातावरण आहे. अधून मधून पावसाच्यसरी देखील बरसत आहेत.

हवामान खात्याकडून आज 25 मे दिवशी मुंबई, ठाणे शहराला यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून तळकोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. वादळी वाऱ्यामुळे तळकोकणात अनेक ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.

महाराष्ट्रात मान्सून दाखल

कसा असेल यंदाचा मान्सून?

यंदा देशासह महाराष्ट्र राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागानं जाहीर केली आहे. यंदा देशात मान्सूनच्या पावसाचं प्रमाण 107 टक्क्यांच्या आसपास राहू शकतं अशी शक्यता आहे.