Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पालघर (Palghar) जिल्ह्यातील विरार (Virar) येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सोमवारी (5 एप्रिल) सकाळी 4 जणांनी एका व्यक्तीचा घरात प्रवेश करुन त्याच्या पत्नीसोबत छेडछाड करण्यास सुरुवात केली. त्यांना विरोध करणाऱ्या पतीला त्या चौघांनी जबर मारहाण केली. यात पतीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर (FIR) दाखल केली असून दोघांना अटक केली. अन्य दोघांचा तपास सुरु आहे. एनएनआयने (ANI) ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र या घटनेमागील कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Malad: लूडो खेळात वारंवार पराभूत झाल्याच्या रागातून मित्राची हत्या, बोगस प्रमाणपत्र बनवून अंत्यसंस्कारही उरकले)

ANI Tweet:

(Suicide in Buldhana: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बुलढाणा येथील धक्कादायक घटना)

महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना वारंवार समोर येत असतात. विनयभंग, लैगिंक शोषण, बलात्कार यामुळे अद्यापही आपल्या समाजात स्त्री सुरक्षेचा प्रश्न कायम आहे. तसंच अनेकदा घरगुती किंवा सामाजिक त्रासातून महिला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. त्याचबरोबर शुल्लक कारणांवरुन हत्या होण्याच्या घटना देखील अलिकडच्या काळात वाढल्या आहेत.