महाराष्ट्रात आज सुद्धा शिक्षणाच्या अभावामुळे आदिवासी समाजातील लोक डॉक्टरांकडून उपचार करुन घेण्याऐवजी तांत्रिकांकडे जातात. यामुळे रुग्णाचा जीव सुद्धा जाऊ शकतो. अशाच प्रकारची एक घटना महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यातील मेळघाट परिसरातून समोर आली आहे. येथील आदिवासी समाजातील एका 3 वर्षीय मुलाची तब्येत ठिक होण्यासाठी तांत्रिकाने त्याच्या पोटावर गरम लोखंडाचे चटके दिले. तांत्रिकाने हे एक किंवा दोन वेळा नव्हे तर वारंवार केले. याच कारणामुळे मुलाची प्रकृती अधिक बिघडली आहे. त्याचसोबत त्याच्या पोटावर गंभीर जखमा सुद्धा झाल्या आहेत.
चिखलदरा जिल्ह्यातील खटकाली परिसरातील राजरत्न जामुनकर नावाचा एक तीन वर्षीय मुलगा आजारी होता. मुलाचे आईवडील परतवाडा परिसरात काम करण्यासाठी राहत होते. त्यांनी मुलाला धामगाव येथील एका खासगी रुग्णालातील डॉक्टराकडून मुलावर उपचार करुन घेतले. पण त्याच्या काहीच फायदा झाला नाही. अशातच त्यांनी आपल्या मुलाला एका तांत्रिकाकडे नेले. तेव्हाच तांत्रिकाने त्याला गरम लोखंडाच्या रॉडेने चटके दिले.(पुणे: प्रियकरासोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार)
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राज्यातील महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयाला भेट दिली. तेथे यशोमती ठाकूर यांनी मुलाच्या प्रकृती बद्दल जाणून घेतले. त्याचसोबत त्याच्या नातेवाईकांसोबत बातचीत करुन त्यांना धीर दिला.