पुणे: प्रियकरासोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार
Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

पिंपरी-चिंचवडमध्ये एक सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 22 वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकरासोबतचा अश्लील व्हिडिओ शेअर करु अशी धमकी देऊन तिच्यावर नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत. दोन फरार आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरबाज खान, सुलतान उर्फ मुश्ताक सय्यद, रियाज ऊर्फ मन्नन खान व सोहेल शेरअली पिरजादे यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरुणीचे आरोपी आरबाज खान याच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यांचा शरीरसंबंधांचा व्हिडिओ आरोपी मुश्ताकने मोबाईलमध्ये शूट केला होता. हा व्हिडिओ व्हायरल करु अशी धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.हेदेखील वाचा- Pune Sextortion Crime: पुण्यातील तरुणाई Honey Trap च्या जाळ्यात; Nude Video फेसबुक फ्रेंड्सना पाठविण्याची धमकी, दोन गुन्हे, 150 तक्रारी दाखल

इतकच करुन ते थांबले नाही हा व्हिडीओ इतर आरोपींना आणि अल्पवयीन मुलांना पाठविल्याने त्यांनी देखील पीडित तरुणीला धमकावत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. या सर्व अत्याचाराला कंटाळून पीडित तरुणीने देहू रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखा युनिट दोनने आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी अद्याप दोन अल्पवयीन मुले फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

लॉकडाऊन काळात पुण्यातील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर सेक्सटॉर्शनची (Sextortion) आणि हनी ट्रॅप (Honey Trap) च्या जाळ्यात अडकत असल्याचे पुढे आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांकडे दोन गुन्हे आणि जवळपास 150 तक्रारी दाखल झाल्या आहेत. काही तरुणींकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढले जात आहे.